गोकुळाष्टमीच्या (Janmashtami 2024) दिवशी दहीकाल्याचा नैवेद्य दाखवात. अशावेळी दही बाहेरून आणून काहीही करण्यापेक्षा आदल्या दिवशी रात्री दही लावून तुम्ही भरपूर दही बनवू शकता. त्यासाठी दही लावण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी. दही (Curd) आपल्या आरोग्यासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर मानले जाते. रोजच्या रुटीनमध्ये तुम्ही दह्याचा समावेश करू शकता. (Curd Making Tips) अनेकजण घरी लावतात पण त्यांना बाजारातलं विकतचं दही खायलाच जास्त आवडतं. घरात मार्केटसारखं दही लावणं कठीण वाटतं. दही लावण्याची सोपी पद्धत लक्षात घेतली तर स्वादीष्ट आणि घट्ट दही लावून होईल. (How To Make Perfect Thick Curd At Home Dahi Making Tips)
घरी दही लावण्याची ही पारंपारीक पद्धत आहे. यासाठी सगळ्यात आधी अर्धा लीटर दूध घ्या. नंतर दूध गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. जेव्हा दूध गरम होऊन उकळेल तेव्हा गॅस बंद कर नंतर दूध थंड होऊ द्या. दूध उकळल्यानंतर ते कोमट करून घ्या. एका भांड्यात अर्धा ते एक टिस्पून दह्याचं विरजण घालून त्यात कोमट दूध घाला.
चमच्याच्या साहाय्याने दही आणि दूधाचे मिश्रण एकजीव करून घ्या. दह्याची पातेली एखाद्या गरम ठिकाणी ठेवा. विरजण घातल्यानंतर दूध वारंवार हलणार याची काळजी घ्या अन्यथा त्यात गुठळ्या पडतात. दह्याच्या भांडयावर एक मोटं कापड घालून ठेवा. नंतर ५ ते ६ तासांसाठी असंच सोडून द्या. जेव्हा दही लागेल तेव्हा त्याची मलई जाड करण्यासाठी त्यात कमी कमी २ तास फ्रिजमध्ये ठेवा. या पद्धतीने तुम्ही घरच्याघरी विकतसारखं दही लावू शकता.
अंगात कॅल्शियम कमी-हाडं कमजोर आहेत? २० रूपयातं ५ पदार्थ खा, कॅल्शियम कधीच कमी पडणार नाही
जर तुम्हाला मार्केटचं दही खाणं आवडत नसेल तर आणि दही लवकर करायचं असेल तर तुम्ही मायक्रोव्हेटव्ह किंवा ओव्हनची मदत घेऊ शकता. यासाठी सगळ्यात आधी गॅसवर दूध गरम करून घ्या त्यानंतर दूध हलकं कोमट करून थंड करून घ्या. त्यानंतर दह्याचं विरजण यात घाला. नंतर मायक्रोव्हेट सुरू करून १८० डिग्रीवर जवळपास २ मिनीटं प्री हीट करा. नंतर स्विच बंद करा.