Lokmat Sakhi >Food > वेटलॉसपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत सगळंच राहील ठणठणीत- रोज फक्त १ चमचा 'ही' चटणी खा

वेटलॉसपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत सगळंच राहील ठणठणीत- रोज फक्त १ चमचा 'ही' चटणी खा

Health Benefits Of Flax Seed: वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत आपल्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेणारा हा एक खास पदार्थ रोजच्या आहारात असायलाच पाहिजे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2024 09:14 AM2024-02-09T09:14:09+5:302024-02-09T09:15:03+5:30

Health Benefits Of Flax Seed: वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत आपल्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेणारा हा एक खास पदार्थ रोजच्या आहारात असायलाच पाहिजे.

Javas Chutney recipe, How to make flaxseed chutney, health benefits of flax seed | वेटलॉसपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत सगळंच राहील ठणठणीत- रोज फक्त १ चमचा 'ही' चटणी खा

वेटलॉसपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत सगळंच राहील ठणठणीत- रोज फक्त १ चमचा 'ही' चटणी खा

Highlightsरोजच्या जेवणात फक्त चमचाभर का हाेईना, पण एक पदार्थ मात्र आवर्जून घेतला पाहिजे. आणि तो पदार्थ म्हणजे जवसाची चटणी...

आपल्यापैकी अनेक जण आहेत, जे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. काही जण कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी झटत असतात. काही जणांच्या डोळ्याच्या आरोग्याच्या तक्रारी असतात तर कुणाला अमिनो ॲसिडची, गूड फॅटी ॲसिडची गरज असते. आपल्या घरातही प्रत्येक सदस्याची अशी आरोग्याविषयीची वेगवेगळी तक्रार असू शकते. तब्येतीशी संबंधित या आणि अशा अनेक तक्रारी दूर करायच्या असतील तर रोजच्या जेवणात फक्त चमचाभर का हाेईना, पण एक पदार्थ मात्र आवर्जून घेतला पाहिजे. आणि तो पदार्थ म्हणजे जवसाची चटणी (Javas Chutney recipe). जवसाची चटणी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून ती कशी करायची (How to make flaxseed chutney) आणि तिचे आरोग्याला काय फायदे होतात ते पाहूया. (health benefits of flax seed)

जवसाची चटणी करण्याची रेसिपी

 

जवसाची चटणी करण्यासाठी आपल्याला १ वाटी जवस, ३ ते ४ वाळलेल्या लाल मिरच्या, पाव वाटी खोबऱ्याचा किस, १ चमचा धने, अर्धा चमचा जिरे आणि ८ ते १० लसूण पाकळ्या आणि चवीनुसार मीठ असं साहित्य लागणार आहे.

लेकीसाठी त्यानं स्वत:ला बदललं! इमरान खान राहतो छोट्याशा प्लॅटमध्ये, बंगला-गाडी विकली कारण..

सगळ्यात आधी तर जवस भाजून घ्या. जवस खूप जास्त भाजले जाणार नाहीत, याची काळजी घ्या. 

यानंतर बाकीचे सगळे पदार्थ थोडे थोडे भाजून घ्या. लसूण पाकळ्या भाजून घेण्याची गरज नाही.

आता भाजून घेतलेले सगळे पदार्थ थंड झाले की चवीनुसार मीठ टाकून मिक्सरमधून फिरवून त्याची चटणी करून घ्या.

रोजच्या जेवणात ही चटणी १ चमचा तरी घ्या. दह्यासोबत किंवा तेल टाकून तुम्ही जवसाची चटणी खाऊ शकता.

 

जवसाची चटणी खाण्याचे फायदे 

१. जवसामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा ३ फॅटी ॲसिड असते.

२. पचनक्रिया अधिक चांगली होण्यासाठी जवसाची चटणी खाणे फायदेशीर ठरते.

बैठ्या कामामुळे हिप्स फॅट, मांडीवरची चरबी वाढली? ३ उपाय- वाढलेली चरबी झरझर उतरेल 

३. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठीही जवस चटणी उपयुक्त आहे.

४. जे लोक वेटलॉस करतात, त्यांच्यासाठीही ही चटणी सर्वोत्तम आहे.

५. त्वचा आणि केस यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही जवस चटणी खाणे फायदेशीर ठरते. 

 

Web Title: Javas Chutney recipe, How to make flaxseed chutney, health benefits of flax seed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.