थंडीचे दिवस म्हटलं की आपल्याला सर्दी, खोकला, ताप असे लहान मोठे आजार होतातच. हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी असते त्यामुळे या ऋतूत आपल्याला अनेक आजारांचा सतत सामना करावा लागतो. यातही (Winter Special Food Javitri Milk) सर्दी, खोकला, ताप हे हिवाळ्यात सगळ्यांनाच सतावणारे कॉमन (How To Make Javitri Milk At Home) आजार आहेत. अशा वारंवार होणाऱ्या सर्दी - खोकल्यावर उपाय म्हणून सारख्या गोळ्या, सिरप घेण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसत. अशावेळी आपण काही घरगुती पारंपरिक उपाय देखील करुन पाहतो(Javitri Milk Recipe Shared By Nayantara Grand Mother Indu Saraswat).
असाच आपल्या आजीचा खास पारंपरिक घरगुती उपाय सुप्रसिद्ध दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री नयनतारा हिने नुकताच शेअर केला आहे. शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी नयनतारा केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही लोकप्रिय आहे. नयनताराच्या आजीने हिवाळ्यात निरोगी राहण्याचा एक खास उपाय सांगितला आहे. या उपायात त्यांनी थंडीच्या दिवसांत आजारांपासून दूर राहण्यासाठी जायफळ घातलेलं दूध पिण्याचा सल्ला दिला आहे. जायफळ घातलेलं दूध ही औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली पारंपारिक रेसिपी तुमची प्रतिकारशक्ती तर वाढवतेच पण शरीराला आतून उबदार देखील ठेवते. यासाठीच यंदाच्या थंडीत जायफळ घातलेलं दूध पिऊन हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करु शकतो. हे दूध नेमक कस करायचं ? कशी प्यावं हे पाहा.
साहित्य :-
१. दूध - १ कपभर
२. मध - १ टेबलस्पून
३. लवंग - ४ ते ५ काड्या
४. छोटी वेलची - ४ ते ६
५. मोठी वेलीची - २
६. काळीमिरी - ५ ते ६
७. हळद - १ टेबलस्पून
८. दालचिनी - २ काड्या
९. जायफळ पावडर - १ टेबलस्पून
कृती :-
१. सगळ्यात आधी एक भांड घेऊन त्यात दूध ओतून दूध मंद आचेवर ठेवून हलकेच गरम करून घ्यावे.
२. आता दूध गरम झाल्यावर त्यात वरील सगळे खडे मसाले एक एक करुन घालावेत.
३. सगळे खडे मसाले घातल्यानंतर दूध ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर ठेवून गरम करून घ्यावे. त्यानंतर दुधाला एक उकळी काढून घ्यावी.
४. दूध व्यवस्थित गरम झाल्यावर गॅस बंद करून दूध थोडे थंड होण्यासाठी ठेवून द्यावे.
५. दूध थंड झाल्यावर त्यात चमचाभर मध घालूंन सगळे जिन्नस मिसळून येण्यासाठी चमच्याने ढवळून घ्यावे.
६. आता सगळ्यात शेवटी दूध गाळणीने गाळून घ्यावे.
ख्रिसमस स्पेशल : महागडा प्लम केक करा घरच्याघरीच, करायला सोपा-खायला टेस्टी, ही घ्या रेसिपी...
दूध कधी आणि कसे प्यावे ?
हे दूध रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्यास त्याचा सर्वाधिक फायदा आपल्या शरीराला होतो. यामुळे हिवाळ्यातील थंडीपासून तुमचे संरक्षण तर होईलच पण तुमच्या शरीराला पूर्ण पोषणही मिळेल. हे दूध तुम्ही सकाळच्या नाश्त्यातही पिऊ शकता.
काळ्या-पिवळ्या-लाल की हिरव्या, कोणत्या मनुका खाणं जास्त फांयद्याचं? मनुका-बेदाणे खावे नक्की कधी?
हिवाळ्यात हे दूध पिण्याचे फायदे...
१. थंडीच्या दिवसांत हे दूध प्यायल्याने घसा खवखवणे, सर्दी, खोकला यांसारख्या लहान आजारांपासून तुमचा बचाव करतात.
२. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीराला हिवाळ्यात होणाऱ्या आजारांशी लढण्यास मदत करतात.
३. हे दूध पचनसंस्था मजबूत करते आणिगॅस किंवा अपचन समस्यापासून संरक्षण करते.
४. रात्री झोपताना हे दूध प्यायल्याने शरीराला विश्रांती तर मिळतेच शिवाय झोपेची गुणवत्ता देखील सुधारते.
५. हे मसाला दूध हिवाळ्यात शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करते.