Lokmat Sakhi >Food > नेहमीची बटाट्याची भाजी नको तर करा १० मिनिटांत होणारी जोधपुरी आलू की सब्जी, बेत होईल खास...

नेहमीची बटाट्याची भाजी नको तर करा १० मिनिटांत होणारी जोधपुरी आलू की सब्जी, बेत होईल खास...

How To Make Chatpata Jodhpuri Aloo Fry : बेबी पोटॅटोचा वापर करून जोधपुरी आलू की सब्जी कशी तयार करायची याची रेसिपी पाहूयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2024 06:28 PM2024-07-23T18:28:55+5:302024-07-23T18:37:48+5:30

How To Make Chatpata Jodhpuri Aloo Fry : बेबी पोटॅटोचा वापर करून जोधपुरी आलू की सब्जी कशी तयार करायची याची रेसिपी पाहूयात...

Jodhpuri Aloo Dum Recipe How To Make Chatpata Jodhpuri Aloo Fry Jodhpuri Aloo Fry | नेहमीची बटाट्याची भाजी नको तर करा १० मिनिटांत होणारी जोधपुरी आलू की सब्जी, बेत होईल खास...

नेहमीची बटाट्याची भाजी नको तर करा १० मिनिटांत होणारी जोधपुरी आलू की सब्जी, बेत होईल खास...

बटाटा हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. बहुतेक प्रत्येक स्नॅक्समध्ये बटाटा हा वापरला जातोच. या बटाट्याच्या भाजी पासून ते स्नॅक्सपर्यंत सगळेच पदार्थ आपण आवडीने खातो. घरात भाजीला काही नसले किंवा आयत्यावेळी भाजी वाढवावी लागली तर आपण अशावेळी बटाट्याचा वापर करतो. सर्व भाज्यांमध्ये  बटाट्याची भाजी ही सगळ्यांच्याच विशेष आवडीची असते. कोणत्याही पदार्थात बटाटा घातला की त्या पदार्थाची चव वाढते(Jodhpuri Aloo Fry).

बटाट्याची भाजी, भजी, पराठे त्याचबरोबर अनेक पदार्थ केले जातात. बटाट्याला लगेच फोडणी देऊन त्याची झटपट होणारी भाजी करता येते. परंतु बटाट्याची तीच ती नेहमीची पिवळी किंवा रस्सा भाजी करण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं नक्की ट्राय करु शकतो. बाजारांत बेबी पोटॅटो म्हणून लहान आकाराचे बटाटे मिळतात. याच बेबी पोटॅटोचा वापर करुन आपण जोधपुरी स्टाईलने जोधपुरी आलू की सब्जी करु शकतो. बेबी पोटॅटोचा वापर करून जोधपुरी आलू की सब्जी कशी तयार करायची याची रेसिपी पाहूयात(How To Make Chatpata Jodhpuri Aloo Fry).     

साहित्य :- 

१. बेबी पोटॅटो - अर्धा किलो 
२. तेल - ३ टेबलस्पून 
३. जिरे - १ टेबलस्पून 
४. बडीशेप - १ टेबलस्पून 
५. हिंग - चिमूटभर 
६. पांढरे तीळ - २ टेबलस्पून 
७. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
८. हळद - १/२ टेबलस्पून 
९. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून 
१०. काश्मिरी लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून 
११. धणेपूड - १/२ टेबलस्पून 
१२. आमचूर पावडर - १ टेबलस्पून 
१३. चिली फ्लेक्स - १/२ टेबलस्पून 

हा घ्या ताकदीचा सुपरडोस; १५ मिनिटांत करा मखाण्याचा उत्तपा- नाश्ता हेल्दी, पुरेल दिवसभर एनर्जी...

पराठ्यासाठी कणीक कशी मळायची पाहा, चपातीसारखेच भिजवाल तर पस्तावाल! परफेक्ट पराठ्यांसाठी खास युक्ती...

कृती :- 

१. आकाराने लहान असणारे बेबी पोटॅटो घेऊन त्यांची साल काढून ते उकडवून घ्यावेत. 
२. हे बटाटे उकडून झाल्यावर त्याला काटा चमच्याने लहान लहान छिद्र करुन घ्यावीत. 
३. एका भांड्यात तेल घेऊन त्यात जिरे, बडीशेप, हिंग, पांढरे तीळ घालावेत. 

४. त्यानंतर त्यात उकडवून घेतलेले बेबी पोटॅटो घालावेत. 
५. आता यात हळद, लाल मिरची पावडर, काश्मिरी लाल मिरची पावडर, धणेपूड, आमचूर पावडर, चिली फ्लेक्स घालावे, आणि व्यवस्थित हलवून घ्यावे. 
६. सगळ्यात शेवटी वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी. 

जोधपुरी आलू खाण्यासाठी तयार आहे. आपण गरमागरम चपाती सोबत हे जोधपुरी आलू खाऊ शकता.

Web Title: Jodhpuri Aloo Dum Recipe How To Make Chatpata Jodhpuri Aloo Fry Jodhpuri Aloo Fry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.