Lokmat Sakhi >Food > ज्वारी-बाजरीचे करा परफेक्ट ग्लूटन फ्री आप्पे, १५ मिनिटांत होणारी पौष्टिक रेसिपी-पचायलाही हलके

ज्वारी-बाजरीचे करा परफेक्ट ग्लूटन फ्री आप्पे, १५ मिनिटांत होणारी पौष्टिक रेसिपी-पचायलाही हलके

Jowar bajra appe easy and healthy recipe : घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून पौष्टीक असणारे हे आप्पे कसे करायचे पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2024 03:03 PM2024-02-12T15:03:35+5:302024-02-12T15:07:11+5:30

Jowar bajra appe easy and healthy recipe : घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून पौष्टीक असणारे हे आप्पे कसे करायचे पाहूया...

Jowar bajra appe easy and healthy recipe : jowar-Bajri Perfect Gluten Free Appe, Nutritious Recipe in 15 Minutes - Easy to Digest | ज्वारी-बाजरीचे करा परफेक्ट ग्लूटन फ्री आप्पे, १५ मिनिटांत होणारी पौष्टिक रेसिपी-पचायलाही हलके

ज्वारी-बाजरीचे करा परफेक्ट ग्लूटन फ्री आप्पे, १५ मिनिटांत होणारी पौष्टिक रेसिपी-पचायलाही हलके

बाजरी किंवा ज्वारी आरोग्यासाठी फायदेशीर असते हे आपल्याला माहित असते.पण डब्यात भाकरी गार होत असल्याने आपल्याकडून पोळीच केली जाते. त्यामुळे आहारात बाजरी आणि ज्वारीच्या पिठाचा म्हणावा तितका समावेश केला जात नाही. पण आरोग्यासाठी हे पीठ उपयुक्त असून त्याचा आहारात समावेश तर करायलाच हवा. भाकरी करायची नसेल तर या पीठाचे आपण नाश्त्याला गरमागरम आप्पे करु शकतो. हे आप्पे अतिशय चविष्ट होत असून त्यामध्ये आपण कोणते पीठ वापरले आहे हे लहान मुलांनाच काय मोठ्यांनाही समजणार नाही. हे आप्पे आरोग्यासाठी पौष्टीक आणि पोटभरीचे असतात. तसेच ते झटपट होत असल्याने नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यासाठीही हा पर्याय अतिशय चांगला ठरु शकतो. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून पौष्टीक असणारे हे आप्पे कसे करायचे पाहूया (Jowar bajra appe easy and healthy recipe)...

साहित्य -

१. ज्वारीचे पीठ – १ वाटी 

२. बाजरीचे पीठ – अर्धी वाटी 

३. रवा - अर्धी वाटी 

४. दही - १ वाटी 

५. कांदा - १ बारीक चिरलेला 

६. लसूण-मिरची पेस्ट – १ चमचा 

७. मीठ – चवीनुसार 

८. साखर – अर्धा चमचा

९. सोडा - अर्धा चमचा 

१०. गाजर, शिमला मिरची, कोबी - आवडीनुसार 

कृती -

१. ज्वारी, बाजरी पीठ, रवा आणि दही सगळे एकत्र करुन घ्यायचे. 

२. यामध्ये लसूण मिरची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा आणि आवडीनुसार भाज्या किसून घालायच्या.

३. मीठ, साखर आणि पाणी घालून हे पीठ चांगले एकजीव करुन घ्यायचे. 

४. साधारण १५ ते २० मिनीटांसाठी हे पीठ झाकून ठेवायचे म्हणजे रवा फुगण्यास मदत होते.

५. थोडा वेळाने सोडा घालून त्यावर थोडेसे पाणी घालायचे आणि पीठ पुन्हा चांगले एकजीव करायचे. 

६. आप्पे पात्राला तेल लावून त्यामध्ये नेहमीप्रमाणे आप्पे करायचे, दोन्ही बाजुने हे आप्पे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आणि चटणीसोबत किंवा नुसते खायला घ्यायचे.  

Web Title: Jowar bajra appe easy and healthy recipe : jowar-Bajri Perfect Gluten Free Appe, Nutritious Recipe in 15 Minutes - Easy to Digest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.