थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता मिळवून देणारे पौष्टिक पदार्थ खाल्ले जातात. या पदार्थांमध्ये तीळ, गूळ, पौष्टिक लाडू, चिक्की यांसारख्या पदार्थांचा समावेश असतो. थंडीच्या दिवसांत ज्वारी, नाचणी, बाजरी यांसारखी धान्य (Jowar Dhani ki Chikki) खाणं देखील अधिक हेल्दी मानलं जात. या काळात वातावरणात गारठा असल्याने ( Jowar Dhani Chikki Recipe) पचायला हलके असणारे पदार्थ खाल्ले जातात. ज्वारीच्या पौष्टिक लाह्या या काळात खाणे आरोग्याच्या (Popped Sorghum Chikki) दृष्टीने अधिक फायदेशीर असते. यासाठी ज्वारीच्या लाह्यांची पौष्टिक अशी चिक्की देखील आपण घरच्या घरीच करु शकतो(Healthy,Quick and Easy to make Jowar Dhani Chikki).
ज्वारीच्या लाह्यांची ही चिक्की आपण मुलांना खाऊच्या डब्यात किंवा संध्याकाळच्या वेळी टी - टाइम स्नॅक म्हणून देखील खाऊ शकतो. यासाठी ज्वारीच्या लाह्यांची पौष्टिक अशी चिक्की घरच्याघरीच कशी तयार करायची याची सोपी रेसिपी पाहूयात. ज्वारीच्या लाह्यांची चिक्की तयार करण्याची रेसिपी sanjeevkapoor यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.
साहित्य :-
१. ज्वारीच्या लाह्या - २ कप
२. साजूक तूप - २ ते ३ टेबलस्पून
३. गूळ - २ कप (किसलेला गूळ)
४. बदामाचे तुकडे - १/२ कप
५. पिस्त्याचे काप - १/२ कप
पराठे कोरडे - सुके होतात? ७ टिप्स, परफेक्ट सॉफ्ट - मऊमुलायम पराठ्यांसाठी लक्षात ठेवा...
भारती सिंगला आवडते तशी नेपाळी पद्धतीची तिळाची चटणी खाऊन तर पाहा, हिवाळ्यातली झणझणीत मजा...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये साजूक तूप घेऊन त्यात ज्वारीच्या लाह्या ३ ते ५ मिनिटे हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्याव्यात.
२. आता या परतून घेतलेल्या लाह्या एका बाऊलमध्ये काढून थोड्या थंड होण्यासाठी ठेवून द्याव्यात.
३. पॅनमध्ये किसलेला गूळ घेऊन तो व्यवस्थित गरम करुन वितळवून घ्यावा.
४. गूळ व्यवस्थित वितळून त्याचा पाक तयार झाल्यावर त्यात परतवून घेतलेल्या ज्वारीच्या लाह्या व भाजून घेतलेले बदामाचे लहान तुकडे घालावेत.
५. आता या ज्वारीच्या लाह्या आणि बदामाचे तुकडे गुळाच्या पाकात व्यवस्थित कोट करून घ्यावेत.
६. आता एक बटर पेपर कडा असलेल्या डिशमध्ये किंवा ट्रेमध्ये व्यवस्थित पसरवून ठेवावा. त्यानंतर चिक्कीचे तयार मिश्रण बटर पेपरवर पसरवून घ्यावे.
७. या चिक्कीवर बदाम आणि पिस्त्याचे काप वरुन भुरभुरवून पसरवून घालावेत.
८. चिक्कीला ट्रे किंवा डिशचा आकार आल्यावर डिशमधून बटर पेपर उचलून बाहेर ठेवावा. आता सुरीच्या मदतीने आपल्या आवडत्या आकारात या चिक्कीचे तुकडे कापून घ्यावेत.
थंडीच्या दिवसांत खाण्यासाठी पौष्टिक अशी ज्वारीच्या लाह्यांची चिक्की खाण्यासाठी तयार आहे.