घावणे हा पदार्थ महाराष्ट्रातील प्रत्येक घरात बनतो (Jowar Dhirde). नाश्ता किंवा डिनरमध्येही काही लोक घावणे खातात. त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी असेल तर, घावणे अधिक चवदार लागतात (Food). घावणे शक्यतो तांदुळाच्या पीठाचे तयार करतात (Cooking Tips). पण आपण कधी ज्वारीचे घावने ट्राय करून पाहिलं आहे का?
महाराष्ट्रीयान घरांमध्ये ज्वारीची भाकरी तयार करतात. ज्वारीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्स असते. शिवाय ज्वारीमध्ये आयर्नचे प्रमाणही जास्त असते. जर आपल्याला तांदुळाचे घावणे खाऊन कंटाळा आला असेल तर, ज्वारीचे घावणे करून पाहा. १० मिनिटात ज्वारीचे पौष्टीक घावणे रेडी(Jowar Dhirde Recipe | Ghavan | Sorghum / Millet Pancakes).
ज्वारीचे पौष्टीक घावणे करण्यासाठी लागणारं साहित्य
ज्वारीचं पीठ
बेसन
मीठ
पाणी
गाजर
हिरवी मिरची
कारली खा, पण त्यासोबत ‘हे’ ४ पदार्थ खाल्ले की पोट बिघडणारच- तब्येत इतकी बिघडेल की..
कोथिंबीर
कांदा
चिली फ्लेक्स
जिरं
मोहरी
कडीपत्ता
हिंग
कृती
एका बाऊलमध्ये एक कप ज्वारीचं पीठ घ्या. त्यात २ चमचे बेसन घाला. नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि पाणी घालून मिक्स करा. ज्या पद्धतीने आपण घावणे तयार करण्यसाठी सरसरीत बॅटर तयार करतो. त्याच पद्धतीने बॅटर तयार करा.
जागतिक वडापाव दिन : वडापावचे पाहा ८ प्रकार; सांगा तुमचा फेवरिट खमंग वडापाव कोणता?
आपण बॅटरमध्ये काही भाज्या देखील घालू शकता. किसलेलं गाजर, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा घालून मिक्स करा. नंतर त्यात चिली फ्लेक्स घाला. नंतर त्यावर फोडणी द्या.
फोडणीच्या पळीत २ चमचा तेल घाला. त्यात एक चमचा जिरं, मोहरी, कडीपत्ता आणि चिमुटभर हिंग घालून मिक्स करा. तयार फोडणी बॅटरमध्ये घालून मिक्स करा. दुसरीकडे पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर ब्रशने तेल लावा. वाटीभर बॅटर पॅनमध्ये ओतून पसरवा. २ मिनिटानंतर घावण पळीने पलटवून दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे झटपट ज्वारीचे पौष्टीक घावणे रेडी.