ज्वारीच्या पीठाचे अनेक फायदे आहेत. ज्वारीच्या पिठाचा आहारात समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्यात मॅग्नेशिअम, तांबे आणि कॅल्शिअम असते. यासह तंतूमय घटकांचे प्रमाण असते, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. ज्वारीच्या पीठाचे अनेक पदार्थ केले जातात. मुख्य म्हणजे भाकरी, धिरडे, घावन यासह अनेक पदार्थ केले जातात.
पण आपण कधी ज्वारीच्या पीठाचे वडे खाऊन पाहिले आहे का? झटपट होणारे हे वडे चवीला तर चविष्ट लागतातच शिवाय, आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. आपण ज्वारीचे वडे नाश्ता किंवा दुपारच्या जेवणात करून खाऊ शकता. चला तर मग ज्वारीच्या पीठाचे खमंग वडे कसे तयार करायचे पाहूयात(Jowar flour vada in 10 minutes | Gluten Free Recipes).
ज्वारीच्या पीठाचे वडे करण्यासाठी लागणारं साहित्य
ज्वारीचे पीठ
रवा
बेसन
लाल तिखट
आप्पे पात्रात ढोकळा करण्याची पाहा भन्नाट ट्रिक, करा मिनी ढोकळा झटपट
धणे पूड
गरम मसाला
हिंग
आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
कडीपत्ता
पांढरे तीळ
ओवा
हळद
कोथिंबीर
पाणी
तेल
कृती
सर्वप्रथम, एका परातीत एक कप ज्वारीचे पीठ, अर्धा कप रवा, २ चमचे बेसन, एक चमचा लाल तिखट, एक चमचा धणे पूड, एक चमचा गरम मसाला, चिमुटभर हिंग, आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, बारीक चिरलेला कडीपत्ता, एक चमचा पांढरे तीळ, एक चमचा ओवा, चिमुटभर हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर व एक चमचा तेल घालून साहित्य एकजीव करा. साहित्य मिक्स केल्यानंतर त्यात पाणी मिसळून घट्टसर पीठ मळून घ्या.
चपाती करताना टाळा ४ चुका, तज्ज्ञ सांगतात या चुकांमुळे चपातीतील पोषण शरीराला मिळत नाही, कारण..
ज्याप्रमाणे आपण कोकणी वडे करण्यासाठी पीठ मळतो, त्याचप्रमाणे पीठ मळायचे आहे. पीठ मळून झाल्यानंतर त्यावर एक चमचा तेल घालून पुन्हा मळून घ्या. ५ मिनिटासाठी पिठावर कापड किंवा झाकण ठेऊन बाजूला ठेवा. दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. ५ मिनीटानंतर हाताला तेल लावा, व थोडे पीठ घेऊन मेदू वड्याचा आकार द्या. गरम तेलात वडे सोडून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे ज्वारीच्या पीठाचे वडे खाण्यासाठी रेडी.