Lokmat Sakhi >Food > ज्वारीचे आप्पे करा फक्त १५ मिनिटांत, गुबगुबीत ग्लूटन फ्री आप्पे-नाश्त्याला बेस्ट-शाळेच्या डब्यासाठीही मस्त

ज्वारीचे आप्पे करा फक्त १५ मिनिटांत, गुबगुबीत ग्लूटन फ्री आप्पे-नाश्त्याला बेस्ट-शाळेच्या डब्यासाठीही मस्त

Jowar Ke Appe I Gluten Free Recipes I Healthy Jowar Appe : घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून पौष्टीक आप्पे एकदा करून पाहाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2024 09:35 PM2024-06-28T21:35:06+5:302024-06-28T21:38:44+5:30

Jowar Ke Appe I Gluten Free Recipes I Healthy Jowar Appe : घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून पौष्टीक आप्पे एकदा करून पाहाच..

Jowar Ke Appe I Gluten Free Recipes I Healthy Jowar Appe | ज्वारीचे आप्पे करा फक्त १५ मिनिटांत, गुबगुबीत ग्लूटन फ्री आप्पे-नाश्त्याला बेस्ट-शाळेच्या डब्यासाठीही मस्त

ज्वारीचे आप्पे करा फक्त १५ मिनिटांत, गुबगुबीत ग्लूटन फ्री आप्पे-नाश्त्याला बेस्ट-शाळेच्या डब्यासाठीही मस्त

निरोगी आरोग्यासाठी उत्तम आहार घेणं गरजेचं. गहू, ज्वारी, बाजरी यासह विविध कडधान्य खाणं गरजेचं (Jowar Appe). ज्वारीची भाकरी आपण सर्वजण खातो. ज्वारीची भाकरी, थाळीपीठ, आपण खाल्लीच असेल. पण कधी ज्वारीचे आप्पे खाऊन पाहिलं आहे का? ज्वारीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत (Healthy food). ज्वारीमध्ये असणाऱ्या अ‍ॅमिनो अ‍ॅसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटिन्स मिळतात.

सध्या लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते (Cooking Tips). त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते. जर आपल्याला ज्वारीची भाकरी खाऊन कंटाळा आला असेल, आणि हटके नाश्ता खायचा असेल तर, ज्वारीचे आप्पे ट्राय करा. चमचमीत आप्पे आपल्या सर्वांना आवडतील(Jowar Ke Appe I Gluten Free Recipes I Healthy Jowar Appe).

ज्वारीचे गुबगुबीत आप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य

ज्वारीचं पीठ

दही

मीठ

हळद

ओवा

गाजर

सिमला मिरची

टिफिनसाठी मुलांनी पराठा मागितला? टेन्शन घेऊ नका, १० मिनिटांत करा बटाटा पराठा, सारण न करता

कोबी

कांदा

लसूण

हिरवी मिरची

इनो

तेल

कृती

सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक कप ज्वारीचं पीठ घ्या. त्यात दीड कप दही, चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, ओवा, बारीक चिरलेल्या गाजर, सिमला मिरची, कोबी, कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा घालून मिक्स करा. आपण त्यात आपल्या आवडीनुसार भाज्या मिक्स करू शकता.

गव्हाची पोळी आणि प्रोटीनरिच? कणकेत मिसळा १ खास पदार्थ, पोळी खाऊनही घटेल वजन

नंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून मिक्स करा. ५ मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा. आप्पे पात्राला ब्रशने तेल लावा, व गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. ५ मिनिटानंतर बॅटरमध्ये एक चमचा इनो घालून मिक्स करा.

चमचाभर बॅटर आप्पे पात्रात सोडा, व त्यावर ७ मिनिटांसाठी झाका. वाफेवर आप्पे शिजले आहे की नाही हे चेक करा. अशा प्रकारे ग्लुटेन फ्री गुबगुबीत आप्पे खाण्यासाठी रेडी. आपण हे आप्पे कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. 

Web Title: Jowar Ke Appe I Gluten Free Recipes I Healthy Jowar Appe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.