नेहमी गहू खाल्लेला चांगला नाही. म्हणून आहारात ज्वारी, बाजरी किंवा नाचणीच्या भाकरीचा समावेश करायला हवा (Jowar Bhakri). इतर धान्यांचे आपण भाकरी करतो. मुख्य म्हणजे महाराष्ट्रीयन घरांमध्ये भाकरी आवश्यक केली जाते (Cooking Tips). सकाळी पोळी खाल्ली की, आपण रात्रीच्या वेळेस भाकरी करतो. पण भाकरी बघावी तितकी करायला सोपी नाही. फक्त थापलं आणि भाकरी तयार होईल असेही नाही.
जर आपल्याला भाकरी थापायला जमत नसेल. पण ज्वारीची भाकरी करायची असेल, तर, लाटूनही आपण भाकऱ्या तयार करू शकता. ज्वारीची भाकरी न थापता कशी करावी? भाकरी करण्याची सोपी पद्धत कोणती? पाहूयात(Jowar Roti Recipe - Easy Tips n Tricks | How To Make Jowar Bhakri).
ज्वारीची भाकरी करण्यासाठी लागणारं साहित्य
ज्वारीचं पीठ
तूप
तेल
कोथिंबीर
शिळ्या चपातीचा करा १० मिनिटात चमचमीत चिवडा, उरलेल्या पोळ्यांचं करु काय? -प्रश्नच विसरा..
मीठ
पाणी
अशा पद्धतीने करा ज्वारीची भाकरी
सर्वात आधी, कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात दोन कप पाणी घाला. मग एक चमचा मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. नंतर त्यात दोन कप ज्वारीचं पीठ घालून मिक्स करा. ज्वारीचं पीठ पाण्यात मिक्स करताना लाटण्याचा वापर करा. मिक्स केल्यानंतर त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा.
भेंडीची भाजी करताना लक्षात ठेवा ४ सोप्या ट्रिक्स, भाजी कधी चिकट-बुळबुळीत होणारच नाही
१० मिनिटानंतर हाताने पीठ मळून घ्या. आता पोळपाट घ्या. त्यावर पिठाचा गोळा ठेवा. त्यावर पीठ शिंपडा, आणि लाटण्याने भाकरी लाटून घ्या. जर आपल्याला भाकरी थापायला जमत असेल तर, भाकरी थापून घ्या.
लाटण्याने भाकरी लाटून झाल्यानंतर गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर भाकरी घालून दोन्ही बाजूने भाजून घ्या. आवड असल्यास आपण भाकरीवर तूप लावू शकता. अशा प्रकारे न थापता टम्म फुगणारी ज्वारीची भाकरी खाण्यासाठी रेडी.