Lokmat Sakhi >Food > प्रजासत्ताक दिन विशेष : घरीच करा पांढराशुभ्र कलाकंद, दुधाचा अगदी सोपा झटपट पदार्थ

प्रजासत्ताक दिन विशेष : घरीच करा पांढराशुभ्र कलाकंद, दुधाचा अगदी सोपा झटपट पदार्थ

Just 2 Ingredients Halwai style Kalakand Milk Cake Barfi : घरच्याघरी कलाकंद करण्याची झटपट कृती, चव अशी की या मिठाईसमोर महागडी बर्फीही ठरेल फेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2024 11:43 AM2024-01-25T11:43:46+5:302024-01-25T13:29:47+5:30

Just 2 Ingredients Halwai style Kalakand Milk Cake Barfi : घरच्याघरी कलाकंद करण्याची झटपट कृती, चव अशी की या मिठाईसमोर महागडी बर्फीही ठरेल फेल..

Just 2 Ingredients Halwai style Kalakand Milk Cake Barfi | प्रजासत्ताक दिन विशेष : घरीच करा पांढराशुभ्र कलाकंद, दुधाचा अगदी सोपा झटपट पदार्थ

प्रजासत्ताक दिन विशेष : घरीच करा पांढराशुभ्र कलाकंद, दुधाचा अगदी सोपा झटपट पदार्थ

दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जातो. यावर्षी भारत ७४ वा वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. आजपासून ७४ वर्षांपूर्वी देशामध्ये संविधान लागू झालं, आणि लोकशाहीचा उदय झाला. या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण होते. प्रत्येकाच्या घरात गोड पदार्थ तयार केले जातात. शिवाय काही जण पेढे, जलेबी किंवा बर्फी वाटून हा दिवस साजरा करतात. जर आपल्याला देखील घरात मिठाई तयार करून आनंद साजरा करायचा असेल तर, दुधाची स्वादिष्ट बर्फी तयार करा (Cooking Tips).

काही ठिकाणी या मिठाईला मिल्क केक किंवा कलाकंद देखील म्हणतात. ही मिठाई चवीला गोड आणि भन्नाट लागते (Milk Cake). शिवाय कमी साहित्यात तयार होते. दुकानातील महागडी मिठाई खाण्यापेक्षा आपण घरात एक लिटर दुधाचा वापर करून मिल्क केक तयार करू शकता(Just 2 Ingredients Halwai style Kalakand Milk Cake Barfi).

दुधाची कलाकंद बर्फी करण्यासाठी लागणारं साहित्य

दूध

लिंबाचा रस

पाणी

सनी लिओनीला आवडतो देसी ढाबास्टाईल आलू पराठा, झटपट पराठा करण्याची पाहा सोपी रेसिपी

वेलची पूड

तूप

कृती

सर्वप्रथम, कढईमध्ये एक लिटर फुल फॅट दूध घाला. दुधाला उकळी फुटल्यानंतर त्यात २ टेबलस्पून लिंबाचा रस आणि २ टेबलस्पून पाणी घालून चमच्याने मिक्स करा. दुधाला सतत चमच्याने ढवळत राहा, जेणेकरून व्यवस्थित फाटले जाईल, शिवाय कणीदार होईल. नंतर ८ ते १० मिनिटासाठी मध्यम आचेवर गॅस ठेवा. फाटलेलं दूध कणीदार झाल्यानंतर त्यात अर्धा कप साखर घालून सतत ढवळत राहा.

ढाबास्टाईल डाळ तडका-घरीच करा १० मिनिटात, रोजच्या वरणाला येईल हॉटेलस्टाईल चव

नंतर त्यात अर्धा चमचा वेलची पूड, २ टेबलस्पून तूप घालून मिक्स करा. नंतर गॅस बंद करा. एका प्लेटला अर्धा चमचा तूप लावा. त्यावर तयार दुधाचे मिश्रण घालून चमच्याने पसरवा, आणि प्लेट अर्धा तासासाठी फ्रिजमध्ये ठेवा. अर्धा तासानंतर सुरीने बर्फी कापून घ्या, व त्यावर बारीक चिरून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालून पसरवा. अशा प्रकारे कलाकंद खाण्यासाठी रेडी.

Web Title: Just 2 Ingredients Halwai style Kalakand Milk Cake Barfi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.