Join us  

मिनरल वाॅटर विकत घेता? फक्त 5 स्टेप्स, घरच्या घरी तयार करा मिनरल वाॅटर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 6:57 PM

विकत न घेताही मिनरल वाॅटर पिण्याची गरज आपण घरच्याघरी भागवू शकतो. घरच्याघरी मिनरल वाॅटर तयार करण्यासाठी आवश्यक असतात केवळ 5 स्टेप्स!

ठळक मुद्देघरच्याघरी मिनरल वाॅटर तयार करण्यासाठी प्युरिफाइड पाण्याची गरज असते. सोडियम आणि पोटॅशियम बायकार्बोनेट घातल्यानं मिनरल वाॅटर संसर्गापसून बचाव करतं. घरघ्याघरी मिनरल वाॅटर तयार करताना फक्त सोडा सिफाॅन या छोट्याशा साधनाची गरज असते. 

आपल्या आरोग्याची काळजी घेताना सर्वात आधी पिण्याच्या पाण्याची काळजी घ्यावी लागते. पिण्याचं पाणी स्वच्छ आणि शुध्द असेल तर आरोग्यविषयक अनेक छोट्या मोठ्या समस्या सहज टाळल्या जातात. आरोग्याबाबात जास्त सजग असणारी माणसं ही घरात वाॅटर प्युरीफायर असतांनाही मिनरल वाॅटरचा उपयोग करतात. अनेकांना परवडत नसतांनाही आरोग्यासाठी विकतच्या मिनरल वाॅटरवर अवलंबून राहावं लागतं. पण हा खर्च टाळता येऊन मिनरल वाॅटर पिण्याची गरजही सहज भागवता येते.  घरच्याघरी 5 स्टेप्समध्ये मिनरल वाॅटर तयार करता येतं. ते कसं?

Image: Google

घरच्या घरी मिनरल वाॅटर

स्टेप 1

घरच्याघरी मिनरल वाॅटर तयार करण्यासाठी सर्वात आधी एका स्वच्छ भांड्यात पाणी भरावं. ते पाणी फिल्टरमध्ये घालून फिल्टर करुन घ्यावं. वाॅटर प्युरिफायर घरात असल्यास एका स्वच्छ, गंधरहित भांड्यात वाॅटर प्युरिफायरमधलं पाणी भरावं.

Image: Google

स्टेप 2

मिनरल वाॅटर तयार करण्याची दुसरी स्टेप म्हणजे प्युरिफाइड पाण्यात बेकिंग सोडा घालावा.  2 लिटर प्युरिफाइड पाण्यासाठी पाव चमचा बेकिंग सोडा घालावा. सोडा पाण्यात स्वच्छ चमच्यानं हलवून घ्यावा. बेकिंग सोडा पाण्यात मिसळल्यानं पाण्यात सोडियम हा घटक मिसळला जातो. यामुळे अपचन, बध्दकोष्ठता, पोट फुगणं, छातीत जळजळ या समस्यांचा धोका टळतो. पाण्यात सोडा घातल्यानं हाडांचं आरोग सुधारतं, संधिवातासारख्या त्रासाची तीव्रता कमी होते. 

Image: Google

स्टेप 3

प्युरिफाइड पाण्यात बेकिंग सोडा घातल्यानंतर त्यात सैंधव मीठ घालावं. दोन लिटर पाण्यात एक चमच्याचा आठवा भाग म्हणजे अगदी चिमूटभर सैंधव मीठ घालावं. सैंधव मीठ हे किटाणुनाशक असतं. शरीराचा किटाणुंपासून बचाव करण्यासाठी सैंधव मिठाचा उपयोग होतो. घरी जे मिनरल वाॅटर तयार करतो त्याची शुध्दता सैंधव मिठाने वाढते. 

Image: Google

स्टेप 4 

चौथी स्टेप म्हणजे पाण्यात पोटॅशियम बायकार्बोनेट घालावं. पाण्यात पोटॅशियम बायकार्बोनेट घातल्यानं हदय निरोगी राहातं. ह्रदयविकारचा धोका कमी होतो. म्हणून घरी मिनरल वाॅटर तयार करण्यासाठी पोटॅशियम बायकार्बोनेटची गरज असते. 

Image: Google

स्टेप 5 

मिनरल वाॅटर तयार करण्यासाठी प्युरिफाइड पाण्यात घातलेल्या सर्व गोष्टी नीट एकत्र मिसळणं गरजेचं असतं. यासाठी सोडा सिफाॅन या साधनाचा वापर करता येतो. कार्बोनेटेड ड्रिंक्स तयार करण्यासाठी या सोडा सिफाॅनचा वापर केला जातो.

सोडा सिफाॅन या यंत्रासोबत एक दोरी किंवा हॅंडल येते. ते या यंत्राला जोडावं. या हॅंडलमधून पाणी घालावं. पाणी घातल्यावर हॅंडल जोरात दाबावं.

Image: Google

अशा प्रकारे घरच्याघरी मिनरल वाॅटर सहज तयार करता येतं. या मिनरल वाॅटरमध्ये सोडियम, पोटॅशियम हे महत्त्वाचे घटक असल्याने या पाण्यामुळे संसर्गापासून बचाव होतो. घरच्या मिनरल वाॅटरमुळे पचन व्यवस्थाही व्यवस्थित काम करते. 

 

टॅग्स :आरोग्यअन्नपाणीमिनरल वॉटर