सकाळी नाश्त्यासाठी गरमागरम आप्पे आणि ओल्या नारळाची चटणी समोर आली की, मनसोक्त अगदी पोटभर हा नाश्ता करावासा वाटतो. आप्पे हा खरं तर दाक्षिणात्य पदार्थ आहे परंतु आजकाल सगळ्याच घरांमध्ये हा पदार्थ अगदी आवडीने बनवला व खाल्ला जातो. आप्पे बनवताना हळुहळु त्यात विविधता येऊ लागली. तांदुळाच्या पिठाचे आप्पे, रव्याचे आप्पे, मिश्र डाळींचे आप्पे, गोड आप्पे, तिखट मसालेदार आप्पे अशा अनेक प्रकारे आप्पे बनवले जातात. आप्पे कोणतेही असोत त्याची चव जिभेवर रेंगाळत रहातेच. मस्त गरमागरम आप्पे नारळाच्या चटणीसोबत खाण्यासाठी खूप छान लागतात.
सहसा रवा किंवा तांदळाचे पीठ व त्यात उडीद डाळ मिक्स करून आप्पे बनवले जातात. हा नाश्ता आरोग्यासाठी अत्यंत चांगला मानला जातो. तसेच दुपारी जेवणापर्यंत पोट अगदी व्यवस्थित भरून राहते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला आप्पे बनवणं तसे फार सोपे आहे. अधिकाधिक घरांमध्ये रव्याचे आप्पे बनवले जातात. रव्याचे हे गोल टम्म फुगलेले जाळीदार आप्पे खाणे म्हणजे स्वर्गसुखच. रोजच्या नाश्त्याला तेच ते उपमा, पोहे खाऊन कंटाळा आला असल्यास आपण झटपट तयार होणारे ताकातले रव्याचे आप्पे घरच्या घरी चटकन बनवू शकतो(How To Make Rava Appe : Instant Rava Appam Recipe).
साहित्य :-
१. बारीक रवा - २ कप
२. तांदूळ पीठ - ३/४ कप
३. ताक - गरजेनुसार
४. मीठ - चवीनुसार
५. कांदा - १ कप (बारीक चिरुन घेतलेला)
६. मिरची - १ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेली)
७. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेली)
८. तेल - २ ते ३ टेबलस्पून
खमंग खुसखुशीत ‘सोयाबिन थालीपीठ’ खाऊन तर पाहा, वजन कमी करण्यासाठीही पौष्टिक नाश्ता...
ना डाळ-तांदूळ भिजवण्याची गरज, ना आंबवण्याची; १० मिनिटांत करा गव्हाच्या पिठाचे डोसे...
कृती :-
१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक रवा, तांदुळाचे पीठ घेऊन त्यात ताक घालून मध्यम कंन्सिस्टंन्सीचे बॅटर भिजवून घ्यावे.
२. हे मध्यम कंन्सिस्टंन्सीचे बॅटर किमान ५ ते ६ तास किंवा रात्रभर भिजत ठेवावे.
३. दुसऱ्यादिवशी हे पीठ भिजून फुलून आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, बारीक चिरुन घेतलेला कांदा, मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यावे.
४. हे सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे.
५. आता आप्पे पात्र गॅसवर ठेवून त्यात थोडे थोडे तेल घालून घ्यावे. त्यानंतर आप्प्याचे तयार बॅटर त्यात एक एक करुन ओतावे.
६. आप्पे पात्रात बॅटर ओतल्यानंतर वरुन पुन्हा एकदा तेल सोडून घ्यावे. आता यावर झाकण ठेवून २ ते ३ मिनिटांसाठी हे आप्पे व्यवस्थित शिजवून घ्यावे.
७. आप्पे एका बाजूने शिजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील शिजवून घ्यावेत.
आता घरीच करा जांभळाचे कुलर आणि गारेगार पॉपसिकल, रखरखीत दुपारी बच्चेकंपनीसाठी खास खाऊ...
आप्पे व्यवस्थित शिजल्यानंतर गरमागरम नारळाच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावे.