Lokmat Sakhi >Food > वाफाळत्या भातासोबत आंबट - गोड कैरीची कढी ! उन्हाळ्यातील स्पेशल मेन्यू - मन होईल तृप्त असा बेत...

वाफाळत्या भातासोबत आंबट - गोड कैरीची कढी ! उन्हाळ्यातील स्पेशल मेन्यू - मन होईल तृप्त असा बेत...

Kairiche Saar Recipe : Raw Mango Curry : kairichi kadhi : kacchya ambyachi kadhi : How To Make Kachhya Kirichi Kadhi : कैरीच्या अनेक पदार्थांसोबतच, कैरीची आंबट - गोड कढी प्या फुरके मारत....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2025 17:47 IST2025-04-11T17:31:45+5:302025-04-11T17:47:46+5:30

Kairiche Saar Recipe : Raw Mango Curry : kairichi kadhi : kacchya ambyachi kadhi : How To Make Kachhya Kirichi Kadhi : कैरीच्या अनेक पदार्थांसोबतच, कैरीची आंबट - गोड कढी प्या फुरके मारत....

kacchya ambyachi kadhi Raw Mango Curry How To Make Kachhya Kirichi Kadhi kacchya ambyachi kadhi | वाफाळत्या भातासोबत आंबट - गोड कैरीची कढी ! उन्हाळ्यातील स्पेशल मेन्यू - मन होईल तृप्त असा बेत...

वाफाळत्या भातासोबत आंबट - गोड कैरीची कढी ! उन्हाळ्यातील स्पेशल मेन्यू - मन होईल तृप्त असा बेत...

उन्हाळ्याला सुरुवात झाली म्हणजे हिरव्यागार कैरीचा सिझन आलाच. सध्या बाजारात ठेल्यावर हिरव्यागार कैऱ्या विकायला ठेवलेल्या दिसतात. वर्षभरातून फक्त ३ ते ४ महिनेच विकत (Kairiche Saar Recipe) मिळणाऱ्या कैऱ्या घेण्याचा मोह आवरता येत नाही. अशावेळी आपण या कैऱ्या हमखास विकत घेतोच. कैरी (Raw Mango Curry) घरात आणल्याबरोबर  हिरव्यागार कैरीचे अनेक चविष्ट पदार्थ केले जातात. लोणचं, चटणी, मेथांबा, पन्हं (kairichi kadhi) असे काही कैरीचे कॉमन पदार्थ हमखास (kacchya ambyachi kadhi) घरोघरी केले जातात. परंतु कैरीच्या या अनेक पदार्थांसोबतच यंदा कैरीची मस्त आंबट - गोड चवीची कढी देखील नक्की करुन पाहा. एरवी आपण ताकाची कढी करतोच(How To Make Kachhya Kirichi Kadhi).

ताकाची कढी आपण वर्षभरात कधीही खाऊ शकतो, परंतु कैरी ही वर्षभरातून एकदाच चाखायला मिळते त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात कैरीच्या कढीचा झक्कास बेत झालाच पाहिजे. कैरीची कढी करण्यासाठी फारसे साहित्य आणि खूप वेळ खर्च करावा लागत नाही. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात अगदी झटपट ही कढी करता येते. मस्त वाफाळत्या भातासोबत कैरीची आंबट - गोड कढी खाण्याचा आनंद काही औरच असतो. यासाठीच कैरीची कढी झटपट कशी करायची ते पाहा.    

साहित्य :- 

१. ओलं खोबरं - १ कप (किसलेलं)
२. कांदा - १/२ कप 
३. हिरव्या मिरच्या - २ ते ३ मिरच्या 
४. लसूण - ७ ते ८ पाकळ्या 
५. आलं - १ छोटा तुकडा 
६. धणे - १ टेबलस्पून 
७. कैरीचे तुकडे - १ कप 
८. साजूक तूप - १ टेबलस्पून 
९. मोहरी - १ टेबलस्पून 
१०. कडीपत्ता - ७ ते ८ पाने 
११. हळद - १ टेबलस्पून 
१२. मीठ - चवीनुसार 
१३. गूळ - १/२ टेबलस्पून 
१४. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१५. पाणी -  गरजेनुसार

मशिनशिवाय घरीच करा गाड्यावर मिळतो तसा उसाचा रस, थंडगार रसाची इन्स्टंट रेसिपी - वाटेल फ्रेश...


उन्हाळा स्पेशल थंडगार - चटपटीत रायत्याचे ७ प्रकार ! जेवण होईल झक्कास - पोटाला मिळेल नैसर्गिक थंडावा....

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात किसलेलं ओलं खोबरं, कांदा, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, धणे, कैरीचे तुकडे असे सगळे जिन्नस घालावेत. त्यानंतर हे सगळे जिन्नस एकत्रित मिक्सरमध्ये वाटून त्याचे वाटण तयार करावे. 
२. आता एका मोठ्या भांड्यात साजूक तूप घेऊन त्यात मोहरी, लसूण पाकळ्या, कडीपत्ता, तयार वाटण, हळद, चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी घालावे. 

कलिंगड चिरणे म्हणजे किचकट काम? पाहा १ भन्नाट ट्रिक, एक मिनिटात फोडीच फोडी...

३. या कैरीच्या कढीला मध्यम आचेवर हलकेच एक उकळी काढून घ्यावी. उकळी आल्यानंतर त्यात गुळाचा छोटा खडा घालावा. 
४. कढी सतत चमच्याने हलवून घ्यावी आणि उकळी आल्यावर गॅस बंद करावा. 
 
मस्त आंबट - गोड चवीची कैरीची कढी खाण्यासाठी तयार आहे. आपण गरमागरम भात किंवा चपातीसोबत कढी खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.

Web Title: kacchya ambyachi kadhi Raw Mango Curry How To Make Kachhya Kirichi Kadhi kacchya ambyachi kadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.