उन्हाळ्याच्या दिवसांतलं एक मुख्य आकर्षण म्हणजे कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घेणे. आता कैरीचा तक्कू, मेथांबा, साखरअंबा, गुळांबा, इंस्टंट लोणचं, छुंदा हे सगळं तर आपण नेहमीच करतो. आता कैरीच्या चटपटीत वड्या करून पाहा.. अतिशय मऊ होणाऱ्या या वड्या अगदी चॉकलेट, गोळ्यांप्रमाणे आपल्याला चघळून खाता येतील (Kairichi Vadi Recipe In Marathi). लहान मुलं तर आवडीने खातीलच पण मोठ्या माणसांनाही अतिशय आवडतील..(kachcha aam vadi recipe) कैरी किंवा कैरीचे पदार्थ पाहून ज्यांच्या तोंडाला पाणी सुटतं अशा सगळ्यांनाच हा पदार्थ खूप आवडेल..(how to make kachcha aam chocolate at home?)
कैरीच्या वड्या करण्याची रेसिपी
साहित्य
४ ते ५ हिरव्या कैऱ्या
१ ग्लास पाणी
अर्धा कप साखर
खूपच हडकुळे दिसता- काही केल्या वजन वाढत नाही? चमचाभर मेथ्यांचा 'हा' उपाय करा- तब्येत सुधारेल
चवीनुसार थोडंसं मीठ आणि १ चमचा काळं मीठ
मिरेपूड, जिरेपूड आणि चिलीफ्लेक्स प्रत्येकी एकेक चमचा
कृती
सगळ्यात आधी कैरीची सालं काढून घ्या आणि तिचे कोय काढून तिचे बारीक बारीक तुकडे करा.
यानंतर कढईमध्ये १ कप पाणी घाला. पाणी गरम झालं की त्यात कैरीचे तुकडे घाला. यामध्ये थोडंसं मीठ घालून कढईवर झाकण ठेवून द्या.
पुढच्या ५ ते ७ मिनिटांत कैऱ्यांच्या फोडी छान मऊ पडतील. या मऊ पडलेल्या फोडी मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्यानंतर त्याचा गर गाळणीतून गाळून घ्या.
तयार झालेला गर कढईमध्ये घाला. त्यामध्ये अर्धा कप साखर, काळं मीठ, नेहमीचं मीठ, चिली फ्लेक्स, जिरेपूड, मिरेपूड असं सगळं घालून हे मिश्रण १० ते १२ मिनिटांसाठी शिजवून घ्या.
डार्क सर्कल्समुळे कमी वयातच वयस्कर, थकलेले दिसता? ६ उपाय- काळी वर्तुळे जाऊन सुंदर दिसाल
यामध्ये तुम्ही हिरव्या रंगाचा फूड कलर घालू शकता किंवा नाही घातला तर चालतो. आता एका ताटलीला तूप लावून घ्या. त्यावर तयार केलेला कैरीचा गर थोडा कोमट झाल्यानंतर पसरवून टाका. तो एखादा दिवस उन्हात वाळू द्या.
यानंतर त्याचा रोल करा आणि बारीक बारीक काप करा. या कैरीच्या वड्या किंवा कैरीच्या गोळ्या चघळायला खूप छान लागतात.