साधारणतः मार्च, एप्रिल महिन्यांदरम्यान बाजारांत हिरव्यागार, आंबट - गोड कैऱ्या विकायला सुरुवात होते. कैरी आंबट असल्यामुळे कैरीपेक्षा गोड आंबा खाणं अनेकांना खूप आवडतं. असे असले तरीही हिरव्यागार आंबट - गोड कैऱ्या खाण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. उन्हाळ्यांत कैरीचे अनेक पदार्थ तयार केले जातात. हे कैरीचे पदार्थ बनवून वर्षभर खाण्यासाठी साठवले जातात. या कैरीच्या पदार्थांना वर्षभर खाऊन आनंद लुटणे याहून मोठे सुख नाही. कैरीचे लोणचे, कैरीचं पन्ह, साठवणीची मसाला कैरी, कैरीची चटणी असे असंख्य पदार्थ कैरीपासून घरोघरी बनवले जातात.
कैरी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आंब्याप्रमाणे कच्ची कैरी देखील आरोग्यासाठी वरदान आहे. उन्हाळाच्या सिझनची सुरुवात झाली की आंबा आणि कैरी प्रेमींसाठी जणू काही सोहळाच सुरु होतो. हिरव्यागार कच्च्या कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाणे ही जणू पर्वणीच असते. कैरीच्या या हंगामात कैरीचे अनेक पदार्थ बनवून खाल्ले नाही तरी, रसरशीत कैरी त्यावर मीठ, मसाला सोबत चाट मसाला वैगरे भुरभुरून किमान या पद्धतीने तरी कैरी खाल्ली जाते. आपण रोजच्या जेवणांत भात खायचा कंटाळा आला की काहीतरी वेगळं म्हणून भाताचे अनेक प्रकार करुन खातो. पुलाव हा भाताचा प्रकार अतिशय लोकप्रिय आहे तसेच सगळ्यांनाच पुलाव खाणे अतिशय आवडते. यंदाच्या वर्षी कच्च्या कैरीपासून झटपट तयार होणारा कच्च्या कैरीचा पुलाव घरी नक्की ट्राय करुन पहा(Raw Mango Pulao Recipe by Chef Kunal Kapur).
साहित्य :-
१. कच्ची कैरी - १, १/२ कप २. तेल - ३ टेबलस्पून ३. हिंग - १/२ टेबलस्पून ४. मोहरी - १ टेबलस्पून ५. सुक्या लाल मिरच्या - ३ ते ४ ६. आलं - २ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेले)७. लसूण - २ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेली)८. कांदा - ४ ते ५ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेला)९. मीठ - चवीनुसार १०. हिरवी मिरची - १ (बारीक चिरलेली)११. कढीपत्ता - ५ ते ६ पाने१२. भात - २, १/२ कप (उकडवून घेतलेला)१३. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
कृती :-
१. सर्वप्रथम, कच्ची कैरी स्वच्छ धुवून तिचे लहान - लहान मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्यावेत. २. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात हिंग, मोहरी, सुक्या लाल मिरच्या, आलं, लसूण, बारीक चिरलेला कांदा घालूंन फोडणी तयार करुन घ्यावी. ३. आता या फोडणीत कच्च्या कैरीचे बारीक कापून घेतलेले तुकडे घालावेत.
शिल्पा शेट्टीने शेअर केली तिच्या आजीची ‘नीर डोसा’ सिक्रेट रेसिपी, पाहा नेमका कसा करायचा...
आंब्याच्या मौसमात आमरस खाण्याची चंगळ, पण घाईच्यावेळी कसा कराल झटपट आमरस?
४. या मिश्रणात मीठ, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून सगळे जिन्नस एकजीव करुन घ्यावेत. ६. तयार झालेल्या या फोडणीत शिजवून घेतलेला भात व बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात. ७. त्यानंतर तयार झालेल्या या पुलाववर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घालावी.
कच्च्या कैरीचा आंबट - चिंबट चवीचा झटपट तयार होणारा पुलाव खाण्यासाठी तयार आहे.