Lokmat Sakhi >Food > थंडीत करा कढी पकोड्यांचा बेत; कढी अजिबात फुटणार नाही-रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम झटपट बेत

थंडीत करा कढी पकोड्यांचा बेत; कढी अजिबात फुटणार नाही-रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम झटपट बेत

Kadhi Pakora Recipe in Marathi (Kadhi Pakora Making Steps at home) : ढाबास्टाईल कढी पकोडे घरच्याघरी करणं अगदी सोपं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 01:16 PM2023-12-20T13:16:58+5:302023-12-20T16:06:51+5:30

Kadhi Pakora Recipe in Marathi (Kadhi Pakora Making Steps at home) : ढाबास्टाईल कढी पकोडे घरच्याघरी करणं अगदी सोपं आहे.

Kadhi Pakora Recipe in Marathi : Punjabi Kadhi Pakoda Recipe Easy Pakoda Kadhi | थंडीत करा कढी पकोड्यांचा बेत; कढी अजिबात फुटणार नाही-रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम झटपट बेत

थंडीत करा कढी पकोड्यांचा बेत; कढी अजिबात फुटणार नाही-रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम झटपट बेत

हिवाळ्याच्या (Winter Special Recipe's) दिवसांत नेहमीच काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होते. (Kadhi Pakode Kase kartat) कढी भात, कढी-खिचडी असे पदार्थ थंडीत जास्त प्रमाणात बनवले जातात. (Kadhi Pakore Recipe) पण परफेक्ट कढी बनवणं सर्वांनाच जमतं असं नाही. कधी कधी कढी फुटते तर कधी ताक जास्त आंबट होते. साधी ताकाची कढी करण्यापेक्षा तुम्ही  झटपट तयार होणारे कढी पकोडे बनवू शकता. (How to make punjabi kadhi at home) ढाबास्टाईल कढी पकोडे घरच्याघरी करणं अगदी सोपं आहे. परफेक्ट कढी आणि पकोडे करण्याची सोपी पद्धत पाहूया. (How to make Kadhi Pakore)

कढी पकोडे करण्याची सोपी पद्धत कोणती? (Punjabi Kadhi Pakoda Recipe)

1) कढी  तयार करण्यासाठी दोन भागात मिश्रण तयार करून घ्या. एक कढी करण्यासाठी आणि दुसरं पकोडे करण्यासाठी.  सगळ्यात आधी पकोडे करण्यासाठी एक वाडग्यात एक कप बेसन काढून घ्या. त्यात थोडं थोडं पाणी घालून  एकजीव करून घ्या. हे मिश्रण  जास्त पातळ किंवा घट्ट असू अन्यथा भजी व्यवस्थित होणार नाही. २० मिनिटांसाठी हे मिश्रण बाजूला ठेवून द्या.

2) कढी बनवण्यासाठी आंबट दही घ्या. जर दही आंबट नसेल तर  चव व्यवस्थित लागणार नाही. कढी करण्याच्या २ ते ३ तास आधी दही फ्रिजमधून बाहेर काढून ठेवून द्या म्हणजे आंबटपणा चांगला येईल. 

3) मिक्सरच्या भांड्यात १ कप बेसन घाला त्यात २ कप दही घाला. दही आंबट नसेल तर जास्त घाला. त्यात तुम्ही चुटकीभर हळद घालू शकता हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. 

4) १५ ते २० मिनिटांनी बाजूला ठेवलेले पकोड्यांची मिश्रण छान फुललेले असेल. हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने एकाच दिशेने फेटून घ्या. कढईत तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर चमच्याच्या मदतीने भजीचे पीठ घालून गोलाकार पकोडे मध्यम आचेवर तळून घ्या. पकोडे दोन्ही बाजूंनी शेकून घ्या. 

5) कढी बनवण्यासाठी कढईत १ ते २ टेबलस्पून तेल घाला. त्यात १ टिस्पून जीरं,  १ टिस्पून आल्याचा किस, पाव टिस्पून मेथीचे दाणे, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, ५ ते ६  चिरलेले लसूण घालून परतून घ्या. हे जिन्नस जास्त काळे होणार नाही याची काळजी घ्या अन्यथा कढीला परफेक्ट रंग येणार नाही.  

१ वाटी बेसनाचा करा मऊ-जाळीदार ढोकळा: न दळता, डाळ न भिजवता पटकन करा विकतसारखा ढोकळा

6) मिक्सरमध्ये बारीक केलेल्या बेसन आणि दह्याच्या मिश्रणात ३ ते ४ कप पाणी घाला. तुम्ही गरजेनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्ही ज्या भांड्याने दही घेतात त्यात भांड्याने पाण्याचे प्रमाणही मोजा.  मध्यम आचेवर कढी शिजवून घ्या. कढीला उकळ फुटेपर्यंत कंटिन्यू ढवळत राहा.  जर ढवळले नाही कढी फुटू शकते. कढी पूर्ण तयार झाल्यानंतर त्यात मीठ घाला. 

7) कढीला  उकळ आल्यानंतर त्यात पकोडे घाला. पुन्हा चमच्याच्या साहाय्याने कढी व्यवस्थित ढवळून घ्या.  १० मिनिटं मंद आचेवर कढी शिजू द्या. नंतर तुम्हाला दिसेल कढीवर पातळ सायीप्रमाणे थर तयार व्हायला सुरूवात झाली आहे. नंतर गॅस बंद करून कढीवर कोथिंबीर घाला.

२ मिनिटांत नारळ फुटून खोबरं बाहेर निघेल; शेफ कुणाल कपूरनं सांगितली सोपी ट्रिक, किचकट काम होईल सोपं

8) एका फोडणी पात्रात  मोहोरी, जीरं, लाल तिखट, कढीपत्त्याचा तडका देऊन ही फोडणी तयार कढी पकोड्यांच्या  कढईत घाला. तयार आहे गरमागरम कढी पकोडे.

Web Title: Kadhi Pakora Recipe in Marathi : Punjabi Kadhi Pakoda Recipe Easy Pakoda Kadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.