Join us  

रेस्टाँरंटस्टाईल कढी पकोड्यांची सोपी रेसिपी; थंडीत झटपट करा गरमागरम कढी-पकोड्यांचा बेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 1:51 PM

Winter Special Kadhi Pakora Recipe (kadhi pakoda kasa banvaycha) : भाताबरोबर किंवा पोळीबरोबर खाण्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. परफेक्ट कढी पकोडे करण्याची सोपी रेसिपी पाहूया.

हिवाळ्यात (Winter Special Recipes) शरीराला उष्णता मिळण्यासाठी गरम पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. जेवणात सूप, कढी असे पदार्थ बनवले जातात. दह्याची कढी (Kadhi Pakode Recipe) हा अनेक घरांमध्ये केला जाणारा कॉमन पदार्थ आहे. याच रेसिपीत थोडा बदल करून तुम्ही  रेस्टाँरंटस्टाईल कढी पकोडे बनवू शकता. भाताबरोबर किंवा पोळीबरोबर खाण्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. परफेक्ट कढी पकोडे करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to make Kadhi Pakode)

कढी पकोडे करण्याची सोपी रेसिपी (Kadhi Pakode Recipe in Marathi)

१) सगळ्यात आधी  मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप बेसन घ्या. बेसनात २ कप दही घाला. दही आंबट असेल तर उत्तम चव येते. पण जर दही आंबट नसेल तर फ्रिजमधून काढून थोडावेळ बाहेर ठेवा. ज्यामुळे थोडा आंबटपणा येईल. बेसन आणि दह्यात अर्धा टिस्पून हळद, अर्धा टिस्पून लाल मिरची पावडर घाला. हे पदार्थ १ मिनिटं मिक्सरमधून फिरवून घ्या. तुम्ही हाताने सुद्धा बेसन आणि दही मिसळू शकता पण परफेक्ट कंसिटन्सी येण्यासाठी मिक्सरमध्ये बारीक केल्यास उत्तम ठरते.  दह्यात पेस्टमध्ये ३ कप पाणी घालून पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्या आणि बाजूला ठेवा. 

२) पकोडे बनवण्यासाठी एक कप बेसनात, ओवा, हिंग, हळद, मीठ, कसुरी मेथी, हिंग आणि थोडं थोडं पाणी घालून एकजीव  करून घ्या. पकोड्यांचे पीठ नेहमची घट्ट ठेवा जास्त पातळ असेल तर टेक्सचर बिघडेल. तयार बेसनाचे पीठ एकाच दिशेने फेटून घ्या जेणेकरून यात हवा शिरेल आणि मऊ होतील. 

३) पीठ फेटून घेतल्यानंतर त्यात चिरलेली हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, चिमुटभर बेकींग सोडा घाला.  पकोडे तळण्यासाठी जास्त तेल घालू नका. कमीत कमी तेल वापरा. एक बाजू तळून झाल्यानंतर वरच्या बाजूला तेल घाला. पकोडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्या. 

थंडीत इडलीचे पीठ जराही फुलत नाही? डाळ-तांदूळ दळताना हा पदार्थ घाला, मऊ-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या

४) कढी करण्यासाठी कढई गॅसवर ठेवून त्यात फोडणीसाठी तेल घाला. गरम तेलात मोहोरी, जीर, कढीपत्ता, मिरचीचे काप, हिंग घालून चमच्याने हलवत राहा. शेवटी यात आलं आणि मेथीचे दाणे घाला. नंतर कढीचा बेस म्हणजेच बेसन आणि दह्याचे मिश्रण यात घाला. गरजेनुसार १ ते २ कप पाणी अजून घाला. हाय फ्लेमवर ५ ते ७ मिनिटं कढी शिजवून घ्या. कढई गॅसवर असताना कंटिन्यू चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्या. ढवळले नाही तर बेसन खाली बसेल आणि दहीवर येईल. 

विरजण नसेल दही कसं लावायचं? ५ ट्रिक्स वापरा, विकतसारखं घट्ट-मलईदार दही पटकन बनेल घरी

५) कढी उकळ्यानंतर शेवटी मीठ घाला आधी मीठ घातल्यास कढी फुटण्याची शक्यता असते. उकळून उकळून कढी घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा आणि यात पकोडे घाला.  एका फोडणी पात्रात साजूक तूप घालून जीरं, लाल मिरची, कढीपत्ता, हिंग घालून फोडणी तयार करून घ्या. तयार फोडणी कढीमध्ये घालून चमच्याने एकजीव करून घ्या. तयार आहेत गरमागरम कढी पकोडे

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्नपाककृती