Lokmat Sakhi >Food > गॅसही न पेटवता २ मिनिटांत करा कडीपत्त्याचा चटकदार ठेचा, बघा झटपट होणारी सोपी रेसिपी

गॅसही न पेटवता २ मिनिटांत करा कडीपत्त्याचा चटकदार ठेचा, बघा झटपट होणारी सोपी रेसिपी

Easy And Simple Recipe Of Curry Leaves Chutney: कडीपत्त्याचा चटकदार ठेचा करण्याची एकदम सोपी रेसिपी पाहा. अगदी २ मिनिटांत ही रेसिपी होते. (kadipatta thecha recipe in marathi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2024 03:04 PM2024-07-04T15:04:27+5:302024-07-04T15:05:03+5:30

Easy And Simple Recipe Of Curry Leaves Chutney: कडीपत्त्याचा चटकदार ठेचा करण्याची एकदम सोपी रेसिपी पाहा. अगदी २ मिनिटांत ही रेसिपी होते. (kadipatta thecha recipe in marathi)

kadipatta thecha recipe in marathi, how to make curry leaves chutney, easy and simple recipe of curry leaves chutney | गॅसही न पेटवता २ मिनिटांत करा कडीपत्त्याचा चटकदार ठेचा, बघा झटपट होणारी सोपी रेसिपी

गॅसही न पेटवता २ मिनिटांत करा कडीपत्त्याचा चटकदार ठेचा, बघा झटपट होणारी सोपी रेसिपी

Highlightsबऱ्याचदा असं होतं की एवढ्या बहुगुणी कडीपत्त्याची पाने आपण वेगवेगळ्या पदार्थांमधून अलगद बाहेर काढून टाकतो. यामुळे शरीराला त्याचा लाभ होत नाही. म्हणूनच आता कडीपत्त्याचा अतिशय चटकदार असा ठेचा करून ठेवा

कडीपत्त्यामध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड खूप चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे ॲनिमियाचा त्रास कमी करण्यासाठी तो आपल्या आहारात नियमितपणे असावा. याशिवाय रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठीही कडीपत्ता उपयोगी ठरत असल्याने मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठीही तो फायदेशीर ठरतो. कडीपत्त्यामुळे पचन संस्थेचे कार्यही सुधारते. त्यामुळे कडीपत्ता आपल्या आहारात नियमितपणे असावा, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. कडीपत्त्याच्या नियमित सेवनाने केसांचीही चांगली वाढ होते. पण बऱ्याचदा असं होतं की एवढ्या बहुगुणी कडीपत्त्याची पाने आपण वेगवेगळ्या पदार्थांमधून अलगद बाहेर काढून टाकतो. यामुळे शरीराला त्याचा लाभ होत नाही. म्हणूनच आता कडीपत्त्याचा अतिशय चटकदार असा ठेचा करून ठेवा (how to make curry leaves chutney). हा ठेचा सगळेच जण आवडीने खातील. (kadipatta thecha recipe in marathi)

कडीपत्त्याचा ठेचा करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ मोठी वाटी भरून कडीपत्त्याची ताजी हिरवीगार पाने 

४ ते ५ हिरव्या मिरच्या, मिरच्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.

कियारा आडवाणी म्हणते कोणत्याही महागड्या फेसपॅकपेक्षा 'हा' घरगुती फेसपॅकच सर्वोत्तम- ट्राय करून पाहा

८ ते १० लसूण पाकळ्या

१ टेबलस्पून शेंगदाणे

१ टीस्पून जिरे

अर्ध्या लिंबाचा रस

चवीनुसार मीठ

 

कृती 

सगळ्यात आधी कडीपत्त्याची पाने व्यवस्थित धुवून पुर्णपणे कोरडी करून घ्या. पानं पुर्णपणे वाळल्यानंतर ती मिक्सरच्या भांड्यात टाका.

कडीपत्त्यासोबतच जिरे, लसूण पाकळ्या, शेंगदाणे, मीठ आणि मिरच्यांचे तुकडेही मिक्सरच्या भांड्यात टाका आणि चांगली बारीक पेस्ट करून घ्या.

योगा- व्यायाम करायला वेळच नाही? फक्त ५ मिनिटांचे 'असे' स्ट्रेचिंग करा, वजन मुळीच वाढणार नाही

आता ही वाटलेली चटणी एका वाटीमध्ये काढा आणि त्यात लिंबू पिळा. सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घेतले की झाला कडीपत्त्याचा चटकदार ठेचा तयार. हा ठेचा फ्रिजमध्ये ठेवल्यास २ ते ३ दिवस चांगला राहातो.

तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ठेच्यावर वरतून फोडणी घालूनही खाऊ शकता. 

 

Web Title: kadipatta thecha recipe in marathi, how to make curry leaves chutney, easy and simple recipe of curry leaves chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.