Lokmat Sakhi >Food > हिरव्यागार कैरीचा करा चटपटीत भात ; उन्हाळ्यात तोंडाला चव आणणारी पारंपरिक रेसिपी...

हिरव्यागार कैरीचा करा चटपटीत भात ; उन्हाळ्यात तोंडाला चव आणणारी पारंपरिक रेसिपी...

Kairi Raw Mango Rice Recipe : झटपट होणारी आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी कशी करायची पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 11:35 AM2023-04-07T11:35:24+5:302023-04-07T11:37:33+5:30

Kairi Raw Mango Rice Recipe : झटपट होणारी आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी कशी करायची पाहूया...

Kairi Raw Mango Rice Recipe : A traditional summer mouth-watering recipe... | हिरव्यागार कैरीचा करा चटपटीत भात ; उन्हाळ्यात तोंडाला चव आणणारी पारंपरिक रेसिपी...

हिरव्यागार कैरीचा करा चटपटीत भात ; उन्हाळ्यात तोंडाला चव आणणारी पारंपरिक रेसिपी...

थंडीच्या दिवसांत काहीही खाल्लं तरी थंडी असल्याने ते चांगलं पचतं. पण उन्हाळ्याच्या दिवसांत मात्र आपल्याला सतत पाणी पाणी होत असतं आणि त्यामुळे अन्न नीट जात नाही. उकाड्याने आपल्या तोंडालाही विशेष चव नसते. अशावेळी आपल्याला सतत वेगळं आणि चविष्ट काहीतरी खावसं वाटतं. याच काळात बाजारात आंबट-गोड चवीची कैरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. या कैरीचे आपण तोंडी लावायला लोणचे किंवा चटणी करतो. पण याच कैरीचा भातही खूप छान होतो. आपण लेमन राईस करतो त्याच पद्धतीने हा कैरीचा भात आंबट-गोड आणि चविष्ट लागतो. झटपट होणारी आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी कशी करायची पाहूया (Kairi Raw Mango Rice Recipe)... 

साहित्य -

१. तांदूळ - १ वाटी 

२. कैरी - १

३. साखर - २ चमचे

(Image : Google)
(Image : Google)

४. मीठ - चवीनुसार 

५. कडीपत्ता - ६ ते ७ पाने

६. मिरची - २ 

७. शेंगादाणे - मूठभर

८. डाळं - २ चमचे 

९. कोथिंबीर - अर्धा वाटी

१०. तेल - अर्धी वाटी

११. जीरं - अर्धा चमचा

१२. हिंग-हळद - अर्धा चमचा

कृती -

१. आपण नेहमी कुकरला ज्याप्रमाणे भात करतो तसा भात शिजवून घ्यायचा.  

२. कैरी स्वच्छ धुवून सालं काढून घ्यायची आणि कैरी किसायची 

३. कढईमध्ये तेल घालून त्यात जीरं, हिंग, हळद घालायचे

४. यामध्ये कडीपत्ता, मिरची, दाणे, डाळं, घालून सगळे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे.

५. यामध्ये कैरीचा किस घालायचा आणि पुन्हा थोडे परतून घ्यायचे. 

६. यावर शिजलेला भात घालून त्यावर मीठ, साखर घालायची आणि चांगले एकजूव करुन घ्यायचे.

७. भात शिजलेला असल्याने हा भात एक वाफ काढली तरी चांगला होतो .

८. यावर कोथिंबीर धुवून बारीक चिरावी आणि ती वरुन घालावी. 

 

Web Title: Kairi Raw Mango Rice Recipe : A traditional summer mouth-watering recipe...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.