कैरी, आंबा हे वर्षातून फक्त काही महिनेच मिळणारे फळं घराघरात अतिशय लोकप्रिय आहेत. इतर बरेचसे फळं असेच हंगामी असतात. पण कैरी किंवा आंब्याच्या वाट्याला जे लाड, प्रेम येतं, ते इतर फळांना जरा क्वचितच मिळतं. उन्हाळ्याच्या दिवसांत आधीच जेवण जरा कमी जातं. त्यामुळे मग जेवणात एखादा कैरीचा आंबट- गोड पदार्थ असेल तर जेवणाची रंगत आणखी वाढते आणि मग दोन घास जरा जास्त खाल्ले जातात. काही कैरीप्रेमी तर असे आहेत की त्यांना उन्हाळ्यात जेवणामध्ये तोंडी लावायला कैरीचा एक तरी पदार्थ पाहिजेच असतो. म्हणूनच अगदी ५ मिनिटांत कैरीचा तक्कू झटपट कसा करायचा ते पाहून घ्या (kairi takku recipe in marathi). रेसिपी अगदी सोपी आणि सगळ्यांना खूप आवडणारी. (raw mango chutney recipe in just 5 minutes)
कैरीचा तक्कू करण्याची रेसिपी
साहित्य
१ मध्यम आकाराची कैरी
२ टेबलस्पून कोणताही आंबा लोणचे मसाला
सकाळी व्यायामाला वेळच मिळत नाही? रात्री व्यायाम करा- मिळतील दुप्पट फायदे, वजनही उतरेल
३ टेबलस्पून गूळ
१ ते २ टीस्पून तिखट
चवीनुसार मीठ
१ टेबलस्पून मेथ्या
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग
कृती
सगळ्यात आधी कैरीची सालं काढून घ्या.
त्यानंतर एका मध्यम आकाराच्या किसनीने कैरी किसून घ्या. अगदी बारीक छिद्रं असलेली किसनी नको. कारण त्यामुळे तक्कू अगदीच चिकट, लगदा झाल्यासारखा होतो.
डोसा करायच्या नावाखाली भलताच गोंधळ, बघा व्हायरल रेसिपी आणि सांगा 'त्या' पदार्थाला म्हणायचं काय
त्यानंतर किसलेली कैरी एका भांड्यात काढून घ्या आणि त्यामध्ये लोणचे मसाला, मीठ, गूळ घाला. तिखट जरा बेतानेच टाकावे. कारण लोणचं मसाल्यात तिखट असते.
यानंतर गॅसवर एक छोटी कढई ठेवा आणि तेल, मोहरी, हिंग टाकून फोडणी करून घ्या.
ही खमंग फोडणी आता किसलेल्या कैरीवर टाका आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. हिरव्याकंच कैरीचा चटकमटक तक्कू झाला तयार...