उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आपण पाणी व पाणीदार फळे खातो (Kakdicha Korda). कलिंगड, आंबे, संत्री, लिंबू यासह इतर रसरशीत फळे खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते (Food). शिवाय या दिवसात आपण काकडीचे सेवन अधिक प्रमाणात करतो. काकडीची कोशिंबीर, सॅलॅड किंवा थालीपीठ करून खातो. जेवणापूर्वी आपण एक काकडी खाल्ली तरी, पोट जास्त भरते. काकडी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत (Cooking Tips). पण आपण कधी काकडीचा कोरडा करून पाहिलं आहे का?
महाराष्ट्रीयन पद्धतीने तयार करण्यात येणारा काकडीचा कोरडा अतिशय सोपी रेसिपी आहे. जर आपल्याला रोजची एकच प्रकारची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, एकदा काकडीचा पौष्टीक-झणझणीत कोरडा करून पाहा. याला आपण काकडीचा झुणका देखील म्हणू शकता. १० मिनिटात तयार होणारा काकडीचा कोरडा कसा तयार करायचा पाहूयात(Kakdicha Karda: Know Why The Maharashtrian Cucumber Jhunka is so delicious).
काकडीचा कोरडा करण्यासाठी लागणारं साहित्य
काकडी
बेसन
तेल
मोहरी
कोपर - गुडघ्यांचा काळेपणा वाढतच चालला आहे? दह्यात मिसळा २ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात दिसेल फरक
हिंग
हिरवी मिरची
मीठ
हळद
लाल तिखट
पाणी
कोथिंबीर
कृती
सर्वप्रथम, काकडीची साल पीलरने सोलून काढा. नंतर किसणीने काकडीचा किस तयार करा. काकडीचा किस तयार केल्यानंतर त्यातून अतिरिक्त पाणी पिळून काढा. आता एका कढईत २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून भाजून घ्या. नंतर त्यात एक चमचा हळद, एक चमचा लाल तिखट घालून मसाले भाजून घ्या.
तळल्यावर पुऱ्या तेलकट होतात? पीठ भिजवताना घाला १ पांढरा पदार्थ, पुऱ्या तेलकट होणारच नाहीत
आता त्यात किसलेली काकडी आणि चवीनुसार मीठ घालून परतवून घ्या. नंतर एका बाऊलमध्ये ३ चमचे बेसन घ्या. त्यात २ चमचे पाणी घालून बॅटर तयार करा. तयार बेसनाचे बॅटर काकडीच्या मिश्रणात घालून मिक्स करा. गॅसची फ्लेम लो ठेवा, त्यावर झाकण ठेवा, आणि वाफेवर झुणका शिजवून घ्या. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे पौष्टीक - झणझणीत काकडीचा कोरडा खाण्यासाठी रेडी.