Join us

कंगना राणौतला खूप आवडते ‘या’ पद्धतीने केलेली बटाट्याची भाजी, पाहा रेसिपी-चमचमीत आणि चटकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2024 14:44 IST

Kangana Ranaut's Special Recipe Of Aloo Fry: अभिनेत्री कंगना राणौतने बटाट्याची भाजी करण्याची एक सोपी रेसिपी सांगितली आहे. कधीतरी ही रेसिपी ट्राय करून पाहा, तुम्हालाही आवडेल...(batatyachi bhaji recipe by actress Kangana Ranaut).

ठळक मुद्देही मस्त गरमागरम भाजी पोळी किंवा भाकरी सोबत खा. लहान मुलांनाही खूप आवडेल.

बटाट्याची भाजी हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. कोणाला उकडून केलेली बटाट्याची भाजी आवडते तर कोणाला बटाट्याची रस्सा भाजी आवडते. आलू बैंगन, कांदा बटाटा हे देखील बटाट्याचे कॉम्बिनेशन्स अनेकांना खूप आवडतात. आता अभिनेत्री कंगना राणौतने बटाट्याच्या भाजीची एक आणखी मस्त रेसिपी सांगितली आहे (Kangana Ranaut's Special Recipe Of Aloo Fry). या रेसिपीने बटाट्याची भाजी ट्राय करून पाहा. लहान मुलांसकट घरातल्या सगळ्यांनाच नक्की आवडेल. (batatyachi bhaji recipe by actress Kangana Ranaut)

कंगना राणौतने सांगितलेली बटाट्याच्या भाजीची रेसिपी 

 

साहित्य 

४ मध्यम आकाराचे बटाटे

२ टेबलस्पून तेल 

कडीपत्त्याची ८ ते १० पाने 

केस वाढतील भराभर, त्वचाही होईल सुंदर- तुकतुकीत, बघा कसा करायचा खोबरेल तेलाचा वापर

१ टीस्पून मोहरी

३ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या

१ टीस्पून हळद 

१ टीस्पून हिंग

गणेशउत्सव 2024: खोबऱ्याची खिरापत करण्याची एकदम सोपी रेसिपी; १० मिनिटांत गणपतीच्या आवडीचा नैवेद्य तयार

१ टीस्पून लाल तिखट 

१ टेबलस्पून बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर 

चवीनुसार मीठ 

 

कृती 

सगळ्यात आधी बटाट्याची सालं काढा आणि ते फ्रेंचफ्राईजच्या आकारात चिरून घ्या. 

गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल टाका आणि तेल तापलं की मोहरी घालून फोडणी करून घ्या.

रोपांसाठी करा खडूचा वापर! बघा मस्त ट्रिक- रोपं वाढतील भराभर, इतर खतांची गरजच नाही

फोडणी तडतडली की कढीपत्त्याची पाने, हिंग, हळद आणि हिरव्या मिरच्या टाका आणि मग बटाट्याचे काप टाकून परतून घ्या.

सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि झाकण ठेवून भाजीला ५ ते ७ मिनिटे वाफ येऊ द्या. 

यानंतर झाकण काढून सगळी भाजी एकदा हलवून घ्या. त्यामध्ये मीठ, लाल तिखट टाका आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण हलवून घ्या आणि झाकण ठेवून पुन्हा थोडी वाफ येऊ द्या. 

 सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाका आणि ही मस्त गरमागरम भाजी पोळी किंवा भाकरी सोबत खा. लहान मुलांनाही खूप आवडेल.

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती