Join us  

कांजीवरम..साडी नव्हे इडली! ही कांजीवरम इडली करतात कशी, खातात कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 7:23 PM

दक्षिण भारतात इडलीचे वेगवेगळे प्रकार केले जातात. त्यातलीच कांजीवरम इडली हा एक चविष्ट प्रकार आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी कांजीवरम इडली आणि सांभार हा चटपटीत पदार्थ फायदेशीर आहे.

ठळक मुद्देकांजीवरम इडलीसाठी डाळ तांदूळ वेगळे भिजवावेही लागतात आणि वेगळे वाटावेही लागतात.मिश्रण आंबवायला ठेवण्याआधीच त्यात मसाले आणि मीठ घालावं लागतं. मिश्रण वीस तास आंबवावं लागतं.

हलका फुलका, पौष्टिक नाश्ता यासाठी पोहे, उपमा, इडली, डोसे, कॉर्नफ्लेक्स , ओटस, दलिया हे तेच तेच पदार्थ खाऊन उबग आला असेल तर एकाच पदार्थाचे दोन रुचकर पर्यायही आहेत.दक्षिण भारतात इडलीचे वेगवेगळे प्रकार केले जातात. त्यातलीच कांजीवरम इडली हा एक चविष्ट प्रकार आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी कांजीवरम इडली आणि सांभार हा चटपटीत पदार्थ फायदेशीर आहे.

Image: Google

कांजीवरम इडली

कांजीवरम इडली करण्यासाठी 2 कप उडदाची डाळ, 3 कप उकडीचा तांदूळ, कढीपत्ता, 2 छोट चमचे जीरे, 2 छोटे चमचे 2 छोटे चमचे काळी मिरी पूड, 2 छोटे आल्याचे तुकडे आणि चवीपुरतं मीठ

Image: Google

कांजीवरम इडली तयार करण्यासाठी आधी डाळ, तांदूळ चांगले धुवून घ्यावेत. ते वेगवेगळे भिजत घालावेत. 3-4 तास भिजल्यानंतर डाळ आणि तांदळातलं पाणी निथळून दोन्ही वेगवेगळे वाटून घ्यावेत. वाटून झाल्यावर डाळ आणि तांदूळ मिश्रण एकत्र करावं. त्यात आलं, हिंग, जिरे, काळी मिरी पूड आणि मीठ घालून हे मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. 20 तास हे मिश्रण झाकून ठेवावं. वीस तासानंतर इडली वाफवायला ठेवावी. या कांजीवरम इडलीवर गरम गरम सांभार ओतून ती खावी. अतिशय चविष्ट लागते.अर्थातच ही इडली हातात भरपूर वेळ असल्यास करावी.