Lokmat Sakhi >Food > कानपूरच्या आजोबांचे स्प्राऊट चाट सोशल मिडियावर सुपरहिट! त्या स्प्राऊटचाटची ही जबरदस्त रेसिपी

कानपूरच्या आजोबांचे स्प्राऊट चाट सोशल मिडियावर सुपरहिट! त्या स्प्राऊटचाटची ही जबरदस्त रेसिपी

पापडी चाट, आलू चाट असे चाटचे अनेक प्रकार तुम्ही खाल्ले असणार. पण सोशल मिडियावर जबरदस्त हिट ठरलेला स्प्राऊट चाट कसा असतो आणि त्याची रेसिपी काय, हे तुम्हाला माहिती आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 06:40 PM2021-11-08T18:40:43+5:302021-11-08T18:41:33+5:30

पापडी चाट, आलू चाट असे चाटचे अनेक प्रकार तुम्ही खाल्ले असणार. पण सोशल मिडियावर जबरदस्त हिट ठरलेला स्प्राऊट चाट कसा असतो आणि त्याची रेसिपी काय, हे तुम्हाला माहिती आहे का?

Kanpur's grandfather's super hit sprout chat recipe! viral on social media! Here is the recipe ... | कानपूरच्या आजोबांचे स्प्राऊट चाट सोशल मिडियावर सुपरहिट! त्या स्प्राऊटचाटची ही जबरदस्त रेसिपी

कानपूरच्या आजोबांचे स्प्राऊट चाट सोशल मिडियावर सुपरहिट! त्या स्प्राऊटचाटची ही जबरदस्त रेसिपी

Highlightsत्यांनी बनवलेली डिश अतिशय यम्मी असून 'माऊथ वॉटरींग चाट' अशा शब्दांत त्यांच्या रेसिपीचे कौतूक होत आहे.

कोणत्याही प्रकारचे चाट म्हणजे जीभेची तृप्ती. म्हणून तर एखाद्या हॉटेलमध्ये जेवढी गर्दी असते, तेवढीच गर्दी भारतातल्या अनेक चाटच्या गाड्यांवर असते. या गाड्यांवर मिळणाऱ्या चाटला जी चव असते, ती एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या जेवणालाही नाही, असे बहुसंख्य भारतीयांचे मत आहे. अशीच जबरदस्त चव आहे कानपूरमधील एका आजोबांच्या हाताला. ते बनवत असलेली चाटची रेसिपीदेखील एकदम हटके आहे. हा चाट जेवढा चटपटीत आहे, तेवढाच तो पौष्टिकदेखील आहे. म्हणूनच तर कानपूरचे हे आजोबा सध्या सोशल मिडियावर भलतेच हिट झाले आहेत. त्यांची स्प्राऊट चाट रेसिपी जाणून घेण्यासाठी अनेकांच्या उड्या पडत आहेत. 

 

सामान्यपणे आपण जे चाट खातो त्यात बटाटा, शेव, पुऱ्या, पापडी असे अनेक पदार्थ असतात. मुळात हे सगळे पदार्थ नसले, तर चाट बनू शकेल का, असा विचार पण आपल्या मनात येतो. पण हीच तरी खरी या रेसिपीची गंमत आहे. कानपूरचे आजोबा जो चाट बनवतात, त्यात हे काहीही नाही. तरीही त्यांनी बनवलेली डिश अतिशय यम्मी असून 'माऊथ वॉटरींग चाट' अशा शब्दांत त्यांच्या रेसिपीचे कौतूक होत आहे. हा चाट बनविण्याची त्यांची रेसिपी अतिशय सोपी आहे. त्यांनी त्यांच्या गाडीवर जवळपास ७ ते ८ प्रकारची मोड आलेली धान्ये ठेवली आहेत. धान्यातून आलेले मोड इतके छान आहेत की बघताक्षणीच तोंडाला पाणी सुटते. सगळे मोड ते एका द्रोणात थोडे थोडे घेतात. त्यावर हिरवी मिरची चिरून टाकतात. हिरवी चटणी, चिंचेचं पाणी आणि वरतून कच्चा कांदा असं सगळं टाकून ते स्प्राऊट चाटची वाटी खवय्यांच्या हातात देतात. या चाटचा स्वाद घेऊन खवय्ये तृप्त होतात, असे अनेक जणांनी सांगितले आहे. 

 

स्प्राऊट्स खाण्याचे फायदे 
मोड आलेली धान्य आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी मोड आलेली धान्ये वाटीभर खाल्ली पाहिजेत. प्रोटीन रीच फूड म्हणून स्प्राऊट्स ओळखले जातात. याशिवाय स्प्राऊट्समध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, डी आणि के तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि लोह यांचं भरपूर प्रमाण असतं. फायबर, फॉलेट, ओमेगा ३ फॅटी ॲसिडदेखील या धान्यातून मिळते. 

 

स्प्राऊट्स खाण्याचे फायदे
१. उर्जा मिळते

उर्जेचा मोठा स्त्राेत म्हणून स्प्राऊट्स ओळखले जाते. एक वाटी स्प्राऊट्स खाल्ले तर त्यामुळे पुढचे कितीतरी तास तुम्ही न थकता काम करू शकतां. त्यामुळे स्प्राऊट्स हा अतिशय उत्तम ब्रेकफास्टपैकी एक मानला जातो. 

२. वजन कमी करण्यासाठी खा स्प्राऊट्स
मोड आलेल्या धान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतात. त्यामुळे पोट लगेचच भरतं आणि खूप वेळपर्यंत भूक लागत  नाही. शरीराचे उत्तम पोषण होते आणि अंगात ताकद येते.  कमी जेवण केल्यामुळे  पोटात कमी कॅलरीज जातात. 

 

३. रोगप्रतिकार शक्ती वाढते 
मोड आलेली धान्ये नियमित खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यांच्या सेवनामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे शरीर निरोगी राहते आणि आजारांपासून दूर राहण्याची शक्ती शरीरात तयार होत जाते. 

 

४. केस आणि त्वचेसाठी उत्तम
मोड आलेल्या धान्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्यांचे नियमित सेवन केल्यास केवळ आरोग्यालाच फायदा होत नाही, तर सौंदर्यातही वाढ होते. केस आणि त्वचेसाठी मोड आलेली धान्ये अतिशय पोषक ठरतात. कारण त्यांच्या सेवनामुळे रक्त शुद्ध होते. रक्त शुद्ध असले की त्वचा नितळ राहते. 

 

५. हृदयरोगाचा धोका कमी होतो
आजकाल कमी वयात हृदयरोग होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. हृदयरोगाचा धोका कमी करायचा असल्यास मोड आलेली धान्ये नियमित खाल्ली पाहिजेत, असा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याची शक्ती मोड आलेल्या धान्यामध्ये असते.  

 

Web Title: Kanpur's grandfather's super hit sprout chat recipe! viral on social media! Here is the recipe ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.