Join us  

साऊथ इंडियन कारा चटणीची झटपट कृती, इडली-डोशासोबत खाण्यासाठी चटकदार चटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2023 5:12 PM

kara chutney recipe - side dish for dosa फक्त १० मिनिटांत होणारी ही दाक्षिणात्य चटणी करुन तर पाहा

दाक्षिणात्य पदार्थ जसे की, डोसा, इडली, मेदू वडा, डाळ वडा, या पदार्थांची क्रेज सर्वत्र पाहायला मिळते. या पदार्थांची खरी रंगत चटणीमुळे वाढते. खोबऱ्याची चटणी आणि सांबार आपण खाल्लंच असेल. पण आपण कधी कारा चटणी खाल्ली आहे का? कारा चटणी चवीला चटपटीत व चविष्ट लागते.

आपण जर हॉटेलमध्ये साऊथ इंडियन डिश खायला गेला असाल तर, ही चटणी हमखास ते देतात. खोबऱ्याची चटणी आपल्या महाराष्ट्रीयन घरात देखील तयार होते. पण कारा चटणी ही साऊथ इंडियन घरात तयार होते. आपण अनेकदा ही चटणी खाल्ली असेल, पण ही चटणी बनवायची कशी याची माहिती तुम्हाला नसेल. चला तर मग या चटकदार - चटपटीत चटणीची कृती पाहूयात(kara chutney recipe - side dish for dosa).

कारा चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

तेल 

उडद डाळ 

चणा डाळ 

आलं

साऊथ इंडियन डाळ वडा बनवण्याची पारंपरिक रेसिपी, पौष्टिक आणि चमचमीत खाण्याचा आनंद

लसूण 

मिरची 

कांदा 

टोमॅटो

काश्मिरी लाल मिरची 

कडीपत्ता 

मोहरी 

मीठ 

या पद्धतीने बनवा चटकदार चवीची कारा चटणी

सर्वप्रथम, एका पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल घालून गरम करा. त्यात उडद डाळ व चणा डाळ घालून भाजून घ्या. त्यानंतर त्यात आलं - लसूण, मिरचीचे काप व बारीक चिरलेला कांदा घालून भाजून घ्या. मिश्रण भाजून झाल्यानंतर त्यात मीठ घालून मिश्रण मिक्स करा. आता त्यात टोमॅटो, काश्मिरी लाल मिरची घालून भाजून घ्या. टोमॅटोची जोपर्यंत पेस्ट होत नाही, तो पर्यंत मिश्रण लो किंवा मिडीयम प्लेमवर भाजून घ्यायचे आहे.

मिरचीचं लोणचं करण्याची पारंपरिक रेसिपी, भूक खवळेल असं चमचमीत लोणचं, पाहा रेसिपी

मिश्रण भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवा. मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, व त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढा. आता फोडणीसाठी एका कढईत तेल गरम करा, त्यात काश्मिरी लाल मिरची, कडीपत्ता, मोहरी घालून तडका द्या. हा तडका चटणीमध्ये मिक्स करा. अशा प्रकारे चटकदार कारा चटणी खाण्यासाठी रेडी. आपण ही चटणी जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा इडली - डोशासोबत देखील खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स