Join us  

नेल्लोरस्टाईल कुरकुरीत करम डोसा घरीच करा; परफेक्ट, चविष्ट रेसेपी- नाश्त्यासाठी अप्रतिम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 5:58 PM

Karam Dosa (Nellore Style) Recipe : करम म्हणजे कांदे आणि लाल मिरची घालून तयार केलेली लाल चटणी. ही चटणी डोश्यावर घातल्यानंतर एक वेगळीच चव येते.

नाश्त्यासाठी  साऊथ इंडियन पदार्थ नेहमी आवडीनं खाल्ले जातात. साधा डोसा, मसाला डोसा, नीर डोसा तुम्ही अनेकदा खाल्ला असेल. हॉटेलमध्येही डोशांचे अनेक प्रकार खायला मिळतात. (Cooking Tips) करम डोसाही तितकाच प्रसिद्ध आहे. याची खास चव नेहमीच जीभेवर रेंगाळते. (How to make karam dosa)  आंध्र प्रदेश राज्यातील रायलसीमा भागात, विशेषत: कडप्पा जिल्ह्यात करम डोसा खूप लोकप्रिय आहे.

करम म्हणजे कांदे आणि लाल मिरची घालून तयार केलेली लाल चटणी. ही चटणी डोश्यावर घातल्यानंतर एक वेगळीच चव येते. करम डोसा करण्याची सोपी पद्धत पाहूया.  करम डोसा हा नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ आहे. (Karam Dosa Recipe)   बटाट्याच्या भाजीसोबत, चटणीसोबत सर्व्ह करायचे असल्यास डोसाच्या मध्यभागी ठेवून दोन्ही बाजूंनी करी फोल्ड करू शकता. (Karam Dosa Nellore Style Recipe)

करम डोशाचे साहित्य

२ कप उडीद डाळ

१/३ कप चणा डाळ

१/३ कप मूग डाळ

१/३ कप तूर डाळ

1 टीस्पून मेथी दाणे

३ कप तांदूळ

कृती

कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी सगळ्यात आधी  उडीद डाळ, चणा डाळ, मूग डाळ, तुरीची डाळ ४ ते ५ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. ३ कप तांदूळही पाण्यात भिजवून ठेवा. तांदूळ आणि डाळी भिजल्यानंतर त्यातलं पाणी व्यवस्थित काढून घ्या.  पाणी काढल्यानंतर मिक्सरमध्ये घालून डाळी आणि तांदूळ वाटून बारीक पेस्ट तयार करा. एका डब्यात हे पीठ आंबवण्यासाठी ठेवा.

मिक्सरमध्ये चिरलेला कांदा, लाल मिरची, लसूण, मीठ आणि पाणी घालून फिरवून घ्या.  डब्यात पीठ ५ ते ६ तास आंबवण्यासाठी ठेवल्यानंतर डोशांसाठी तयार असेल. डोसे करण्यासाठी एका तवा गरम करून तेल लावून घ्या त्यावर गोलाकार डोशाचं बॅटर पसरवा. डोसा अर्धा शिजला की, मिक्सरमध्ये फिरवलेली चटणी डोशावर लावून डोसा फोल्ड करून घ्या. तयार आहे गरमागरम करम डोसा. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स