Lokmat Sakhi >Food > करंज्या तळताना फुटतात? मऊ पडतात? ७ टिप्स - करंज्या होतील खुसखुशीत

करंज्या तळताना फुटतात? मऊ पडतात? ७ टिप्स - करंज्या होतील खुसखुशीत

Karanji Recipe 2 Ways - Authentic & Layered : करंज्या करणं सोपं काम नाही, पण जमू शकेल-पाहा कशा करायच्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2024 08:05 PM2024-10-24T20:05:11+5:302024-10-24T20:06:28+5:30

Karanji Recipe 2 Ways - Authentic & Layered : करंज्या करणं सोपं काम नाही, पण जमू शकेल-पाहा कशा करायच्या?

Karanji Recipe 2 Ways - Authentic & Layered | करंज्या तळताना फुटतात? मऊ पडतात? ७ टिप्स - करंज्या होतील खुसखुशीत

करंज्या तळताना फुटतात? मऊ पडतात? ७ टिप्स - करंज्या होतील खुसखुशीत

दिवाळी (Diwali 2024) जवळ आली की आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे करंजी (Karanji). फराळ करंजीशिवाय अपूर्ण आहे (Faral). करंजी करणं अनेकींना कठीण जातं काही जणींच्या करंजीमध्ये व्यवस्थेत सारण भरलं जात नाही. ज्यामुळे करंजी भरल्यासारखी वाटत नाही. तर काहींची करंजी कडक किंवा वातड होते. काही जणींच्या करंज्या तळता तळताच फुटून जातात. त्यामुळे मग सगळाच गोंधळ उडतो. तेल खराब होते आणि मेहनतही वाया जाते.

करंजी करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. जर आपल्याला परफेक्ट करंजी हवी असेल तर, काही तर काही टिप्स फॉलो करून पाहा. तेलात करंज्या फुटणार नाही. सारणही होईल परफेक्ट(Karanji Recipe 2 Ways - Authentic & Layered).

करंज्या करताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्यात?

- कंरजी तेलात फुटू नये म्हणून नेहमी मंद आचेवर तळा. करंजी करताना कणिक व्यवस्थित मळणंही तितकेच गरजेचं आहे. कणिक मळताना त्यात तेलाचं मोहन, मीठ, पाणी घालावे. पीठ सैलसर नसून घट्ट मळावे.

दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन

- करंजी खुसखुशीत होण्यासाठी कणिक मळण्याआधी, पिठात तेलाचे मोहन घालावे. तूप नसल्यास तेलाचं मोहनही घालू शकता.

- करंजी कडक होऊ नये म्हणून रवा आणि मैदा यांचं प्रमाण अचूक असणे गरजेचे आहे. तसंच कणिक मळताना दूध घालू नका.

- जर कणिक व्यवस्थित मळले गेले असेल तर, करंज्या फाटत नाही. शिवाय करंजीसाठी घेतलेला गोळा खूप पातळ लाटू नये. करंजीचं पीठ कधीही उघडे ठेवू नये. त्याच्यावर झाकण ठेवावं.

हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी

- करंजीचे कड्यांना दूध लावून दाबून बंद करावे. किंवा पाणीही आपण लावू शकता.

-  करंजीच्या सारणासाठी पिठी साखर घरी बनवा. ती विकत आणल्यास काही वेळेस त्यात ओलसरपणा असेल. शिवाय त्यात विविध प्रकारचे ड्रायफ्रुट्स घाला. 

Web Title: Karanji Recipe 2 Ways - Authentic & Layered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.