शारदा विजय तेलंग, जालना
कारलं कडू लागतं, म्हणून अनेक जण ते खाणंही टाळतात. काही जणं कारल्यामधले औषधी गुणधर्म (health benefits of karela) पाहून ते फक्त खायचे म्हणून खातात. पण हे लोणचं जर तुम्ही करून पाहिलं, तर एरवी कारलं पाहून तोंड फिरविणारेही अगदी आवडीने खातील. या लोणच्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात कडवटपणा मुळीच राहात नाही. त्यामुळे ते सहज खाल्लं जातं. जेवणात तोंडी लावायला हे लोणचं एकदा करून बघा (How to make bitter gourd pickle?). अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळात हे लोणचं तयार होतं (Karela achar recipe). शिवाय फ्रिजमध्ये ठेवल्यास ७ ते ८ दिवस चांगलं राहतं.
कारल्याचं लोणचं करण्यासाठी साहित्य
१ मोठ्या आकाराचं कारलं. या लोणच्यासाठी पिवळट- पांढरट रंगाची कारली वापरावीत.
४ लिंबू
बडिशेप, जीरे आणि मोहरी प्रत्येकी १- १ टेबलस्पून
४ टेबलस्पून तेल
झुरळांमुळे हैराण झालात? घरातल्या फक्त ४ गोष्टी वापरा, झुरळ होतील गायब
३ टेबलस्पून लोणचं मसाला
चिमुटभर हिंग
२ टीस्पून हळद
चवीनुसार मीठ
कारल्याचं लोणचं करण्याची पद्धत
१. सगळ्यात आधी कारले स्वच्छ धुवून पुसून घ्या. काेरडे झाल्यानंतर त्याचे उभे पातळ काप करून घ्या. कारले चिरताना बिया काढून टाकण्याची गरज नाही.
२. मोहरी, बडिशेप, जिरे तव्यावर भाजून घ्या आणि थंड झाले की मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्या.
३. आता कारल्याचे काप एका भांड्यात टाका. त्यात लोणचं मसाला, मोहरी- बडिशेप- जिरे यांची तयार केलेली पावडर, मीठ घाला. तिखट खाण्याची आवड असेल तर आणखी लाल तिखटही घालू शकता.
४. आता त्यात लिंबाचा रस पिळा. सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घेतलं की त्यात कोमट तेल टाका. पुन्हा एकदा सगळं लोणचं हलवून घ्या आणि काचेच्या बरणीत भरून ठेवा. ही बरणी फ्रिजमध्ये ठेवावी. जेणेकरून लोणचं ८ ते १० दिवस टिकू शकेल.