Join us

करजिकाई-पोंगल-परप्पू पायसम - पोंगल स्पेशल पदार्थ, दक्षिणेतल्या सणाचं सामूहिक सेलिब्रेशन, संक्रांतीचं सुंदर रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2024 18:01 IST

मकर संक्रांत स्पेशल : उत्तरेत संक्रांत आणि दक्षिणेतला पोंगल, माणसं जोडणारा अनोखा उत्सव.

ठळक मुद्देवातावरणातील सुखद गारवा आणि शिजणाऱ्या पक्वनाचा दरवळ यामुळे एक सामाजिक बंध तयार व्हायचा. 

शुभा प्रभू साटम

महाराष्ट्रात संक्रांत साजरी होते त्याच सुमारास दक्षिण भारतात पोंगल साजरा होतो पश्चिम बंगालमधे जसं दुर्गापूजा असताना आठवडाभर सुट्ट्या असतात तसेच दक्षिण भारतात पणं. पोंगल म्हणजे मोठा उत्सव. भरजरी साड्या, कपडे विकणाऱ्या दुकानात सेल असतात, तेच दागिन्यांबाबतीत. शाळांना पणं सुट्टी दिली जाते. पोंगल हा दक्षिण भारतात खूप महत्त्वाचा सण.

काय काय करता पदार्थ?

कर्नाटकात आपल्या करंजीसारखीच ‘करजिकाई’ होते. तामिळनाडू मधे गूळ नारळ दूध आणि मुगाची डाळ याचे परप्पू पायसम असते. केरळमधे गोड अप्पे करतात.आंध्र प्रदेशात पुरणपोळी सदृश गोड पोळी खोबरे गूळ सारण घालून करतात.तिखट पदार्थात लेकुरवाळी भाजी असतेच.

(Image :google)

 

पोंगल म्हणून खास भात पणं सगळीकडे होतो.थोडक्यात काय तर जे जे पदार्थ केले जातात त्यात गूळ, तीळ, खोबरे, तूप असे उष्मांक देणारे घटक असतात. त्यातच खिचडी/पोंगल आला. या काळात एक तर तांदळाचे नवीन पीक घरात आलेले असल्याने त्याचा भरपूर वापर होतो. खीर म्हणा अथवा खिचडी, हा किंचित चिकट तांदूळ घेतलाच पाहिजे. दक्षिण भारतात काळे तीळ पणं याप्रसंगी खाल्ले जातात. वांगी, शेवगा शेंग,ओले पावटे यांची एकत्र भाजी असते. मुद्दा असा की हा सण आणि त्या हंगामात जे जे पिकते ते सर्व वापरुन पदार्थ केले जातात. किनारपट्टी असल्याने नारळ, तांदूळ,काजू मुबलकआणि तेच घटक घेऊन पदार्थ होतात.

(Image :google) 

 

भौगोलिक परिस्थिती, शेती, वातावरण आणि आहार यांची अगदी यथायोग्य सांगड जुन्या काळी घातली होती.आता हा पोंगल घ्या,अंगणात चुली मांडून,पूजा करून त्यावर तांदूळ खीर/भात शिजवले जाते. एक अर्थी सामूहिक म्हणा. अर्थात गावी अंगण असतेच म्हणा, तर सुशोभित अंगण, रांगोळी, नटलेली माणसे, वातावरणातील सुखद गारवा आणि शिजणाऱ्या पक्वनाचा दरवळ यामुळे एक सामाजिक बंध तयार व्हायचा. 

(Image :google)

तेव्हा सोशल मीडिया नसल्याने असा संपर्क महत्वाचा होता. थोडक्यात माणूस, सण वाऱ, ऋतू आणि समाज यांची योग्य जुळवणुक असते. शेती प्रधान अर्थव्यवस्था असल्याने तो पाया धरून सर्व होते. उत्तम उदाहरण म्हणजेच पोंगल.(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

टॅग्स :अन्नमकर संक्रांतीआरोग्यपोंगल