कारल्याची भाजी म्हटली सगळेच नाक मुरडतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाच ही भाजी नको असते. कारलं चवीला कडू असल्याने ही भाजी म्हणजे अनेकांची नावडतीच असते. मात्र आरोग्यासाठी कारलं अतिशय चांगलं असतं. त्यामुळे डायबिटीस किंवा इतर समस्या असणाऱ्यांनाही आवर्जून कारलं खायला सांगितलं जातं. या कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी महिला कधी ते बराच वेळ पाण्यात भिजवून ठेवतात. कधी मीठ लावून ठेवतात किंवा कधी चक्क वरवंट्याने रगडतात. चिंच गूळ घालून ही भाजी केली तर त्याचा कडूपणा कमी होतो. तळलेले कारल्याचे कुरकुरीत काप, कारल्याचं लोणचं असे याचे बरेच प्रकार आई-आजी अगदी आवर्जून करतात आणि घरातील सगळ्यांच्या पोटात जाईल यासाठी प्रयत्न करत राहतात. भरल्या कारल्याची अशीच आणखी एक चविष्ट रेसिपी आज आपण पाहणार आहोत (Karla bitter gourd Bhaji Easy Recipe).
साहित्य -
१. कारली - ६ ते ७ ( लहान आकाराची )
२. भाजलेले सुके खोबरे - १ वाटी
३. शेंगदाण्याचा कुट - अर्धी वाटी
४. भाजलेले सफेद तीळ - २ चमचे
५. कोथिंबीर - बारीक चिरलेली अर्धी वाटी
६. लाल तिखट - १ चमचा
७. हळद - पाव चमचा
८. जिरे पूड - अर्धा चमचा
९. धणे पावडर - अर्धा चमचा
१०. मीठ - चवीप्रमाणे
११. लिंबाचा रस - १ चमचा
१२. चिंचेचा कोळ - अंदाजे
१३. बेसन - १ चमचा
१४. तेल - पाव वाटी
कृती - -
१. कारली पाण्यात घालून स्वच्छ धुवून ठेवावीत.
२. बाहेर काढल्यावर दोन्ही बाजूचे देठ कापून मध्यभागी मोठी कापून घ्यावीत आणि मधला गर-बिया काढून घ्यावे.
३. चिरलेल्या कारल्यांना सगळ्या बाजूने मीठ लावून ती पुन्हा पाण्यात घालून ठेवावीत. त्यानंतर कारले ५ ते १० मिनिटे ठेवून त्यातील पाणी काढून घ्यावे. अगदी कमी कडू हवे असल्यास कारली पाण्यातून उकडवून घ्यावीत.
४. खोबरं, दाण्याचा कूट, तीळ, सगळे मसाले आणि कोथिंबीर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची.