Lokmat Sakhi >Food > अस्सल कर्नाटकी मधुर वडा करण्याची पारंपरिक रेसिपी, असा खुसखुशीत वडा आणि सोबत चहा हवा...

अस्सल कर्नाटकी मधुर वडा करण्याची पारंपरिक रेसिपी, असा खुसखुशीत वडा आणि सोबत चहा हवा...

How to make authentic Karnataka crispy maddur vada recipe : कर्नाटकांत मधुर वडा हा संध्याकाळच्या टी - टाइम स्नॅक्सच्या वेळी वाफाळत्या गरमागरम चहासोबत खाल्ला जातो... पहा सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2023 01:18 PM2023-09-30T13:18:55+5:302023-09-30T13:35:40+5:30

How to make authentic Karnataka crispy maddur vada recipe : कर्नाटकांत मधुर वडा हा संध्याकाळच्या टी - टाइम स्नॅक्सच्या वेळी वाफाळत्या गरमागरम चहासोबत खाल्ला जातो... पहा सोपी रेसिपी...

Karnataka Style Maddur Vada Recipe, Karnataka Maddur Vada Recipe Spicy Indian Snack | अस्सल कर्नाटकी मधुर वडा करण्याची पारंपरिक रेसिपी, असा खुसखुशीत वडा आणि सोबत चहा हवा...

अस्सल कर्नाटकी मधुर वडा करण्याची पारंपरिक रेसिपी, असा खुसखुशीत वडा आणि सोबत चहा हवा...

दाक्षिणात्य पदार्थ आपल्याकडे मोठ्या चवीने खाल्ले जातात. त्यामध्ये इडली, मेदू वडा, उत्तापा असे अनेक पदार्थ लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. बरेचसे दाक्षिणात्य पदार्थ आपल्याकडे नाश्त्याला हमखास बनवले जातात. या दाक्षिणात्य पदार्थांपैकी आपल्याकडे प्रसिद्ध असलेला कर्नाटक स्पेशल (Karnataka Maddur Vada Recipe Spicy Indian Snack) मधुर वडा. कर्नाटक स्पेशल मधुर वडा (Crispy maddur vada) हा आपल्याकडे डाळ वड्या इतकाच चवीने व आवडीने खाल्ला जातो. कर्नाटकांत मधुर वडा (Karnataka Special Recipes) हा संध्याकाळच्या टी - टाइम स्नॅक्सच्या वेळी वाफाळत्या गरमागरम चहासोबत खाल्ला जातो(Maddur Vade - Evening Snacks Recipe).

दुपारी कितीही पोटभर जेवण झाले असले तरीही संध्याकाळच्या टी - टाइम स्नॅक्सच्या (Maddur Vada Recipe - Easy & Quick Tea Time Snack) वेळी भूक ही लागतेच. अशावेळी आपल्याला चहासोबत काहीतरी मसालेदार, चटपटीत, कुरकुरीत खाण्याची इच्छा तर होतेच. ही भूक भागवण्यासाठी आपण ठेल्यावर जाऊन भजी, वडापाव, सामोसे असे गरमागरम पदार्थ वाफाळत्या कटिंगसोबत खाणे पसंत करतो. परंतु रोज तेच ते भजी, वडे, सामोसे खाण्यापेक्षा आपण झटपट घरच्या घरी कर्नाटक स्पेशल मधुर वडा (How to make maddur vade) बनवू शकतो. कर्नाटक स्पेशल मधुर वडा बनवण्याची सोपी रेसिपी.    

साहित्य :- 

१. कांदा - २ ते ३ (उभे चिरून घेतलेले)
२. कडीपत्ता - ७ ते ८ पाने 
३. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ (बारीक चिरुन घेतलेल्या)
४. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेली)
५. मीठ - चवीनुसार 
६. तांदुळाचे पीठ - १ कप 
७. रवा - १ कप 
८. पांढरे तीळ - १ टेबलस्पून 
९. शेंगदाण्याचा कूट - १ टेबलस्पून 
१०. आल्याचे तुकडे - १ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेले)
११. तेल - २ ते ३ टेबलस्पून 
१२. मैदा - १ कप 

मशीनचा वापर न करताच घरच्या घरी बनवा विकतसारखे स्पायरल पोटॅटो, चमचमीत, मसालेदार तोंडाला सुटेल पाणी...

ड्रायफ्रुट्सचे काप करणं किचकट काम, खूप वेळ लागतो ? २ सोप्या ट्रिक्स, झटपट करा भरपूर पातळ काप...

कृती :- 

१. सर्वप्रथम कांदा उभा लांब आकारात पातळ चिरुन घ्यावा. 
२. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर देखील बारीक कापून घ्यावी. 
३. आता एका मोठ्या बाऊलमध्ये चिरुन घेतलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कडीपत्ता हे सगळे जिन्नस एकत्रित करुन घ्यावेत. 
४. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यावे. 

वडापावच्या गाड्यावर मिळते तशी सुकी लाल चटणी घरी बनवण्यासाठी वापरा १ सिक्रेट पदार्थ, चव अशी की...

साजूक तुपाला बुरशी लागून खराब होऊ नये म्हणून ७ टिप्स, रवाळ, दाणेदार तूप टिकेल वर्षानुवर्षे...

५. आता या मिश्रणात तांदुळाचे पीठ, मैदा, रवा, पांढरे तीळ, शेंगदाण्याचा कूट, आल्याचे तुकडे, तेल घालून वड्याचे पीठ मळून तयार करून घ्यावे. 
६. त्यानंतर या पिठाचे छोटे छोटे गोळे करून प्लास्टिक पेपरवर गोलाकार आकारात थापून घ्यावेत. 
७. थापून घेतलेले वडे गरम तेलात दोन्ही बाजुंनी खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यावेत. 

आपला कर्नाटक स्पेशल खमंग, खुसखुशीत, गरमागरम मधुर वडा खाण्यासाठी तयार आहे. हा वडा चटणी किंवा वाफाळत्या चहासोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.

Web Title: Karnataka Style Maddur Vada Recipe, Karnataka Maddur Vada Recipe Spicy Indian Snack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.