Lokmat Sakhi >Food > Kartiki Ekadashi 2024 : साबुदाणा भिजवायला विसरलात तरी फक्त १० मिनिटांत करा कुकरमध्ये साबुदाण्याची खिचडी, पाहा रेसिपी

Kartiki Ekadashi 2024 : साबुदाणा भिजवायला विसरलात तरी फक्त १० मिनिटांत करा कुकरमध्ये साबुदाण्याची खिचडी, पाहा रेसिपी

Kartiki Ekadashi 2024 Sabudana Khichdi In Pressure Cooker : . साबुदाण्याची मऊ- मोकळी खिचडी तुम्ही कुकरमध्येही करू शकता ते ही अगदी १० मिनिटांत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 01:12 PM2024-11-08T13:12:45+5:302024-11-08T17:14:38+5:30

Kartiki Ekadashi 2024 Sabudana Khichdi In Pressure Cooker : . साबुदाण्याची मऊ- मोकळी खिचडी तुम्ही कुकरमध्येही करू शकता ते ही अगदी १० मिनिटांत.

Kartiki Ekadashi 2024 : How To Make Sabudana Khichdi In Pressure Cooker in 10 minutes | Kartiki Ekadashi 2024 : साबुदाणा भिजवायला विसरलात तरी फक्त १० मिनिटांत करा कुकरमध्ये साबुदाण्याची खिचडी, पाहा रेसिपी

Kartiki Ekadashi 2024 : साबुदाणा भिजवायला विसरलात तरी फक्त १० मिनिटांत करा कुकरमध्ये साबुदाण्याची खिचडी, पाहा रेसिपी

एकादशीच्या (Dev Uthani Ekadashi) दिवशी काहीजण श्रद्धेपोटी तर काहीजण उपवासाच्या पदार्थांवर ताव मारण्यासाठी उपवापस करतात. उपवास म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ती म्हणजे साबुदाण्याची खिचडी. साबुदाणा भिजवण्यापासून खिचडी शिजेपर्यंत बऱ्याच बारीक गोष्टींची काळजी घ्यावी लागते तेव्हा साबुदाण्याची खिचडी परफेक्ट बनते, (How To Make Sabudana Khichdi). साबुदाण्याची मऊ- मोकळी खिचडी तुम्ही कुकरमध्येही करू शकता ते ही अगदी १० मिनिटांत. परफेक्ट साबुदाण्याची खिचडी कुकरमध्ये कशी करायची ते पाहूया. (How To Make Sabudana Khichdi In Pressure Cooker)

कुकरमध्ये साबुदाणा खिचडी करण्याची सोपी पद्धत

सगळ्यात आधी दीड कप साबुदाणा २ वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या. व्यवस्थित धुतल्यानंतर त्यातील एक्स्ट्रा स्टार्च निघून जाते. साबुदाणा धुतल्यानंतर एका डब्यात ठेवा, त्यावर चमचाभर साजूक तूप घाला फ्लेवरसाठी अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा सैंधव मीठ घाला. ४ ते ५ चमचे पाणी घाला. १ कप साबुदाण्यासाठी ३ चमचे पाणी  या प्रमाणानुसार दीड कप साबुदाण्यांसाठी ५ टेबलस्पून पाणी घाला. चमच्यानं हे मिश्रण एकजीव करून घ्या.

कुकरमध्ये पाणी गरम करून त्यात साबुदाण्याचा डबा आणि २ बटाटे शिजवायला ठेवा. पाणी घालताना या कडे लक्ष द्या की, भांड्यात पाणी येऊ नये. नंतर डब्याचं झाकण लावा  मग कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर ३ ते ४ शिट्ट्या काढून घ्या. 

शिट्ट्या  होईपर्यंत  २-३ मिरच्या बारीक चिरून घ्या. १ टोमॅटो, कोथिंबीर, आलं बारीक चिरून घ्या, ४ शिट्ट्या घेतल्यानंतर गॅस बंद करा. प्रेशर कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून घ्या.  सुरूवातील साबुदाणा हाताला चिकट लागेल नंतर आपोआप मोकळा होईल. एका स्ट्रेनरमध्ये घालून त्यात पाणी घालून साबुदाणा वेगळा करून घ्या.

पोटाचे टायर्स सुटलेत-कंबर लठ्ठ दिसते? २१ दिवस हे पदार्थ खा, वितळेल चरबी-फिट दिसाल

उकडलेल्या बटाट्याची सालं काढून घ्या. कुकरमध्ये तूप घालून त्यात शेंगदाणे भाजून घ्या.  शेंगदाणे लाल झाले की एका वाटीत काढून कुकरमध्ये पुन्हा  तूप घाला. जीरं, कढीपत्ता घालून फोडणी घाला, नंतर यात टोमॅटो, चिरलेली मिरची आणि आलं  घाला. टोमॅटो व्यवस्थित शिजवून  घ्या.

पोट सुटलंय-फिगर बिघडलेली दिसते? रोज १ मिनिटं हा व्यायाम करा, बेली फॅट गायब-स्लिम दिसाल

यात साबुदाणे आणि उकडवून चिरलेला बटाटा घाला.  त्यात १ टिस्पून काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, साखर घालून ढवळून घ्या. गॅस  २-३ मिनिटांनी बंद करा. गॅस बंद केल्यानंतर त्यावर ताजी चिरलेली कोथिंबीर घाला. आवडीनुसार वरून लिंबू घालू शकता. तयार आहे मऊ-मोकळी साबुदाणा खिचडी

Web Title: Kartiki Ekadashi 2024 : How To Make Sabudana Khichdi In Pressure Cooker in 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.