एकादशी (Kartiki Ekadashi 2024) आणि दुप्पट खाशी ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. कार्तिकी एकदशीचा मोठा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभरात साजरा केला जातो. एरवी उपवास न करणारे लोकही दाबून खातात पण एकादशीचा उपवास करतात. उपवास म्हटलं की उपवासाचे चमचमीत, खमंग पदार्थ आलेच. कार्तिकी एकादशीच्या दिवशी पटकन होणारे साबुदाणा-बटाटा वडे (Sabudana Vada) बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. हॉटेलसारखे (Vrat Recipes) साबुदाणे वडे घरी बनत नाहीत, वडे तेल पितात तर कधी तेलात फुटतात अशी अनेकांची तक्रार असते. परफेक्ट साबुदाणा वडे करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Kartiki Ekadashi Special Recipe)
साबुदाणा वडा करण्यासाठी लागणारं साहित्य
१) साबुदाणा- १ कप
२) मध्यम आकाराचे बटाटे - ३
३) शेंगदाण्याचे कुट - अर्धा कप
४) बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या - २
५) कढीपत्ता - ५ ते ६
६) बारीक चिरलेली कोथिंबीर - २ चमचे
७) जीरं- १ चमचा
८) मीठ - चवीनुसार
९) तेल - गरजेनुसार
साबुदाणा वडा करण्याची सोपी कृती
१) एक कप साबुदाणा २ वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून रात्रभर कमीत कमी पाण्यात भिजवण्यासाठी ठेवा. सकाळी बटाटे उकडवून त्याची सालं काढून घ्या. उकडलेले बटाटे हातानं कुस्करून घ्या.
2) २ बटाटे किसणं टाळा कारण यामुळे बटाटे चिकट होण्याची शक्यता असते. शेंगदाणे हलके भाजून सालं काढून जाडसर बारीक करून घ्या.
साबुदाणा भिजवायला विसरलात तरी फक्त १० मिनिटांत करा कुकरमध्ये साबुदाण्याची खिचडी, पाहा रेसिपी
३) नंतर एका भांड्यात साबुदाणे घालून बटाटे घाला. त्यात वाटलेले शेंगदाणे घाला त्यात कढीपत्ता, कोथिंबीर, जीरं आणि मीठ घालून व्यवस्थित मिसळा.
४) साबुदाणा वड्याचं पीठ मळताना हाताला थोडं तेल लावा. नंतर छोट्या लाडू प्रमाणे गोळा करून चपटे करून टिक्की बनवा.
पोट सुटलंय-फिगर बिघडलेली दिसते? रोज १ मिनिटं हा व्यायाम करा, बेली फॅट गायब-स्लिम दिसाल
५) तेल गरम करायला ठेवा. तेल तापल्यानंतर वडे घालून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. वडे तेलात फुटू नये यासाठी कडा व्यवस्थित बंद करून घ्या. तयार वडे तुम्ही हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करू शकता.