Join us  

कार्तिकी एकादशी : भगरीसोबत खाण्यासाठी हवीच उपवासाची आमटी, १० मिनिटांत करा चमचमीत पारंपरिक आमटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2024 2:38 PM

Kartiki Ekadashi 2024 Special Menu: कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने भगर आमटी असा बेत करणार असाल तर उपवासाची आमटी कशी करायची, याची रेसिपी एकदा बघाच..(upavasachi amti recipe in Marathi)

ठळक मुद्देभगरीसोबत खायला शेंगदाण्याची चटपटीत आमटी असेल तर उपवासाची मजा निश्चितच वाढते

एरवी बरेच जण उपवास करत नाही. पण आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi 2024) हे उपवास मात्र अनेक जण सहसा चुकवत नाहीत. बऱ्याच घरांमध्ये तर लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळेच जण कार्तिकी एकादशीचा उपवास करतात. त्यामुळे या दिवशी घरात उपवासाचे हमखास थोडे वेगळे आणि चवदार पदार्थ केले जातात. उपवासाच्या दिवशी पोटाला आराम देणारा एक पदार्थ म्हणजे भगर आणि आमटी. भगरीलाच काही भागात वारीचा भात म्हणूनही ओळखले जाते. भगरीसोबत खायला शेंगदाण्याची चटपटीत आमटी असेल तर उपवासाची मजा निश्चितच वाढते (how to make amti or curry for fast?). ही उपवासाची आमटी अतिशय सोप्या पद्धतीने अगदी झटपट कशी करायची ते पाहूया..(upavasachi amti recipe in Marathi)

उपवासाची आमटी करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे

३ ते ४ हिरव्या मिरच्या

भाजी खारट झाली तर घाबरु नका; करा 'हे' उपाय- मीठ जास्त पडल्याचं लक्षातही येणार नाही

२ ते ३ आमसूल

२ टेबलस्पून गूळ

चवीनुसार मीठ

१ टेबलस्पून शेंगदाणा तेल किंवा तूप

१ टीस्पून जिरे (तुमच्या घरी उपवासाला चालत असतील तर)

 

कृती 

सगळ्यात आधी तर शेंगदाणे भाजून घेतलेले नसतील तर ते व्यवस्थित भाजून त्याची टरफलं काढून घ्या.

यानंतर भाजून घेतलेले शेंगदाणे आणि मिरच्यांचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यात थोडं पाणीसुद्धा टाका आणि अगदी बारीक पेस्ट करून घ्या.

दारासमोर काढलेली रांगोळी फेकू नका, ‘असा’ करा वापर- स्वयंपाकघरातली कळकट भांडीही होतील चकाचक

कढई गॅसवर गरम करायला ठेवून त्यात शेंगदाणा तेल किंवा तूप टाका. ज्यांच्या घरात उपवासाला जिरे चालत असतील त्यांनी जिऱ्याची फोडणी करून घ्यावी. ज्यांच्याकडे जिरे चालत नसतील त्यांनी तेल किंवा तूप गरम झाल्यानंतर त्यात सरळ मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आमटीचं वाटण घालावं.

यानंतर वाटण थोडं परतून घेतलं की त्यात ४ ते ५ वाट्या गरम पाणी घाला.. याचवेळी आमसूल, चवीनुसार मीठ आणि गूळ घाला.

आमटीला चांगली उकळी आली की गॅस बंद करा. आंबट, गोड, तिखट चवीची ही आमटी भगरीसोबत खाण्यासाठी अतिशय चवदार लागते. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४