Join us  

उन्हळ्यात खायलाच हवी फणसाची चमचमीत भाजी, चव अशी की येईल गावकडची आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2023 1:07 PM

Kathal dry sabji recipe | Maharashtrian Special Raw jackfruit Sabji Recipeहात चिकट न करता, कमी साहित्यात करा फणसाची चवदार भाजी, पाहा कृती

उन्हाळा म्हटलं की, खाण्याचे व साठवणीचे विविध पदार्थ बनवले जातात. उन्हाळ्यात आंब्याचे लोणचे व फणसाची भाजी आवर्जून केली जाते. गावाकडे चुलीवर फणसाची भाजी बनवली जाते. कोकणात ही डिश फार फेमस आहे. बाजारात फणस आल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक घरात ही डिश केली जाते. फणसाची भाजी दोन पद्धतीने बनवली जाते.

पहिली म्हणजे कच्च्या फणसाची तसेच अर्ध्या कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी बनवली जाते. आपण फणसाच्या गऱ्यांचे काप करून वाळवून वर्षभर साठवून ठेवू शकता. फणसाच्या बियांची देखील भाजी बनवली जाते. फणसापासून अनेक पदार्थ बनवले जातात. त्यातील एक स्पेशल पदार्थ म्हणजे फणसाची भाजी. चला तर मग या पदार्थाची कृती पाहूयात(Kathal dry sabji recipe | Maharashtrian Special Raw jackfruit Sabji Recipe).

फणसाची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य

अर्धवट पिकलेला फणस

ओले खोबरे

लाल तिखट

हळद

मीठ

साऊथ इंडियन कारा चटणीची झटपट कृती, इडली-डोशासोबत खाण्यासाठी चटकदार चटणी

आमसूल

कांदा

लसूण

ओले काजू

या पद्धतीने करा फणसाची चमचमीत भाजी

फणस फोडणे हा मुख्य टास्क मानला जातो. फणसाचे गर लवकर निघत नाही. ते काढताना हात खूप चिकट होतात. यासाठी सर्वप्रथम, हाताला व चाकुला चांगले खोबरेल तेल लावून घ्या. यासाठी अर्धा किंवा पूर्ण कच्चा फणस आपण घेऊ शकता. सर्वप्रथम, फणस फोडून त्याचे गर काढून घ्या.

फणसाचे मोठे  तुकडे करून घ्या. ते कुकरमध्ये शिजण्यासाठी टाका, शिजताना त्यामध्ये थोडेसे मीठ टाका. कुकरमधील तीन शिट्ट्यांमध्ये हा फणस शिजतो.

साऊथ इंडियन डाळ वडा बनवण्याची पारंपरिक रेसिपी, पौष्टिक आणि चमचमीत खाण्याचा आनंद

फणस शिजल्यानंतर फणसाचे तुकडे एका प्लेटमध्ये काढून घ्या. हे तुकडे हाताने कुस्करावेत. आता कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यात ठेचलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा घालून परतवून घ्या. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, मीठ, आमसूल, काजू आणि कुस्करलेले फणस टाकून भाजी परतवून घ्या. भाजीला तेल सुटल्यानंतर, त्यात ओल्या खोबऱ्याचा कीस घालून भाजी मिक्स करा. अशा प्रकारे फणसाची चमचमीत भाजी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स