Lokmat Sakhi >Food > तांदुळात सतत पोरकिडे, अळ्यांचं साम्राज्य? ५ झटपट उपाय, तांदूळ टिकतील वर्षभर

तांदुळात सतत पोरकिडे, अळ्यांचं साम्राज्य? ५ झटपट उपाय, तांदूळ टिकतील वर्षभर

Keep bugs away from rice with these simple tips : महागड्या तांदुळाचे होणार नाही नुकसान, फक्त साठवताना ५ गोष्टी कायम लक्षात ठेवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2024 12:40 PM2024-01-14T12:40:47+5:302024-01-14T12:42:24+5:30

Keep bugs away from rice with these simple tips : महागड्या तांदुळाचे होणार नाही नुकसान, फक्त साठवताना ५ गोष्टी कायम लक्षात ठेवा..

Keep bugs away from rice with these simple tips | तांदुळात सतत पोरकिडे, अळ्यांचं साम्राज्य? ५ झटपट उपाय, तांदूळ टिकतील वर्षभर

तांदुळात सतत पोरकिडे, अळ्यांचं साम्राज्य? ५ झटपट उपाय, तांदूळ टिकतील वर्षभर

तांदूळ (Rice) आपल्या आहारातील महत्वाचे धान्य आहे. तांदुळाचा वापर  करून फक्त भात तयार करण्यात येत नसून, त्याचे विविध पदार्थ केले जातात. तांदुळामध्ये देखील अनेक प्रकार आहेत. काही जण वर्षाभरासाठी लागणारं तांदूळ आणून साठवून ठेवतात. तर काही जण गरजेनुसार तांदूळ विकत आणतात. जास्त प्रमाणात तांदूळ साठवून ठेवताना तांदुळाची विशेष काळजी घ्यावी लागते. पण कधी चुकून ओला हात तांदुळाला लागतो, किंवा ओलसरपणामुळे त्यात किडे आणि अळ्या निर्माण होतात. याचा लगेचच बंदोबस्त केला तर उत्तम. नाहीतर तांदुळात किड्यांचे साम्राज्य निर्माण होते (Kitchen Tips).

यामुळे आपले काम तर वाढतेच, शिवाय किडे,अळ्या लवकर निघूनही जात नाही. तांदुळात किडे, अळ्या निर्माण होऊ नये, यासह वर्षभर टिकून राहावे असे वाटत असेल तर, स्टोर करताना ५ गोष्टी लक्षात ठेवा. तांदूळ वर्षभर टिकतील(Keep bugs away from rice with these simple tips).

तमालपत्र

पदार्थांमधील चव वाढवण्याचे काम करणारे तमालपत्र इतर किचन टिप्ससाठीही मदत करते. तांदुळाला कीड किंवा त्यात अळ्या तयार होऊ नये असे वाटत असेल तर, आपण तमालपत्राचा वापर करू शकता. यासाठी तांदूळ स्टोर करताना त्यात ३ ते ४ तमालपत्र ठेवा. यातील उग्र गंधामुळे तांदुळात किडे येणार नाही.

एक जुडी पालक-कपभर बेसन, भोगीनिमित्त घरीच करा पालकाच्या अख्ख्या पानांची कुरकुरीत भजी

कडूलिंबाची पानं

कडूलिंबाची पानं अनेक कारणांसाठी फायदेशीर ठरते. यासह तांदुळाचे कीटकांपासून संरक्षण करण्यासही उपयुक्त ठरते. यासाठी सुक्या कडूलिंबाची पानं एका सुती कपड्यात बांधा, आणि तांदुळाच्या डब्यातील एका कोपऱ्यात ठेवा. यामुळे वर्षभर तांदुळाच्या डब्यात किडे किंवा अळ्या तयार होणार नाही.

काडेपेटीच्या काड्या

काडेपेटीच्या काडीमध्ये असणारे सल्फर धान्याला लागलेली कीड घालविण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे तांदूळाच्या डब्याभोवती काडेपेटी ठेवा. याच्या वासानेही कीड, अळ्या होणार नाहीत.

लवंग

किडे तांदुळाभोवती फिरकू नये, यासह त्यात अळ्या तयार होऊ नये असे वाटत असेल तर, लवंगाचा वापर करा. यासाठी काही लवंगा घ्या आणि त्या तांदळाच्या डब्यात ठेवा. यामुळे किडे दूर राहतील आणि मुंग्याही येणार नाहीत.

न खाई भोगी..तो सदा रोगी, भोगीची भाजी करण्याची पाहा अस्सल पारंपरिक रेसिपी, आजीची हातची चव

लसूण

लसणाचा वापर फक्त फोडणीसाठी नसून तांदुळातील किडे घालवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यासाठी तांदुळाच्या डब्यात संपूर्ण, न सोललेला लसूण ठेवा. याच्या उग्र गंधामुळे तांदुळात कीटक किंवा अळ्या तयार होणार नाहीत.

Web Title: Keep bugs away from rice with these simple tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.