Join us  

श्रीखंड बनवताना लक्षात ठेवा या ८ गोष्टी, दसऱ्याला विकतसारखे मऊ, मुलायम श्रीखंड बनवा झटपट घरच्या घरीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2023 8:49 PM

Dussehra Special Food Tips : Home - Made Shrikhand : श्रीखंड बनवताना हमखास होणाऱ्या काही बेसिक चुका टाळल्या तर विकतसारखे फक्कड श्रीखंड घरच्या घरीच बनवू शकतो... नक्की ट्राय करून पहा..

'श्रीखंड' हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय गोड पदार्थांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील काही सण हे श्रीखंड - पुरी या पारंपरिक कॉम्बिनेशन शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. दसरा, होळी, रक्षाबंधन, गुढीपाडवा या काही खास सणांना आपण आवर्जून श्रीखंड पुरीचा बेत करतोच. महाराष्ट्रीयन थाळीत श्रीखंड - पुरी यांना अतिशय मानाचे स्थान आहे. आईस्क्रीमप्रमाणेच श्रीखंडाचे वेगवेगळे फ्लेवर्स सगळ्यांना आवडतात. खरंतर एरव्ही कधीही हा पदार्थ घरी तयार करता येतो किंवा बाहेरून आणता येतो, पण सणासुदीला याचं विशेष महत्त्व असतं(How to make Shrikhand At Home).

'दसरा' (Dussehra Special Recipe) म्हटलं की सगळ्यांच्याच घरी गरमागरम टम्म फुगलेली पुरी आणि श्रीखंडाचा बेत केला जातो. अनेकजण वेळेअभावी श्रीखंड बाजारातून विकत  आणतात, किंवा हल्ली काहीजणांना पारंपरिक श्रीखंड (Homemade Shrikhand Recipe : Indian Sweets) घरी तयार करणे जमतच नाही. परंतु अजूनही काही घरात दसऱ्याला श्रीखंड (Dussehra Special Food Tips : Home - Made Shrikhand) हे घरीच बनवलं जात. श्रीखंड घरी बनवताना ते हवं तस मनासारखा तयार झालं तर खायला मज्जा येते. परंतु तेच श्रीखंड बनवायचं हे गणित फसलं तर हिरमोड होतो. अशावेळी घाई गडबडीत विकतचे श्रीखंड आणण्याखेरीज दुसरा पर्याय आपल्याकडे नसतो. श्रीखंडासाठी खूपच मोठा घाट घालावा लागतो असं अनेकांना वाटतं, त्यामुळे शक्यतो श्रीखंड विकत घेणे हाच सोपा पर्याय निवडला जातो. परंतु काही सोप्या टिप्स फॉलो करुन आपणही विकतसारखे चविष्ट श्रीखंड घरात नक्कीच बनवू शकतो. श्रीखंड बनवताना हमखास होणाऱ्या काही बेसिक चुका टाळल्या तर विकतसारखे फक्कड श्रीखंड घरच्या घरीच बनवू शकतो(Keep these 8 things in mind while making shrikhand).

श्रीखंड बनवताना काही बेसिक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे...  

१. घरच्या घरी श्रीखंड बनविणे सोपे आहे. फक्त काही गोष्टींची काळजी घेतली तर अगदी विकत सारखे श्रीखंड घरीच तयार करु शकता. सर्वप्रथम दही आंबट होणार नाही याची काळजी घ्यावी. 

२. श्रीखंड बनवण्यासाठी दही कापडात बांधताना, दही स्वच्छ कापडात घेऊन व्यवस्थित गोलाकार घट्ट बांधून ठेवून द्या. जेणेकरून दह्यातील सर्व पाणी निघून जाईल. दह्यातील सर्व पाणी निघून गेले आहे याची एकदा खात्री करुन घ्यावी.  

नवरात्र स्पेशल : उपवासासाठी सोप्या ४ स्टेप्समध्ये झटपट बनवा बटाट्याची रस्सा भाजी, बनवायला सोपी खायला चविष्ट...

उपवासाची भजी खाता आली तर काय मजा ना ? करा चमचमीत उपवासाची भजी, पाहा रेसिपी...

३. पिस्ता, बदाम आणि काजू किंवा इतर ड्रायफ्रुटस अख्खे न घालता चिरून किंवा त्यांचे बारीक काप करुनच घालावेत. 

४. श्रीखंड बनवताना त्यात मनुका घालू नका यामुळे मूळ श्रीखंडाची चव लागत नाही. 

५. श्रीखंडामध्ये केशर घालायचे असल्यास, केशर दुधात फेटून आधीच ठेवा आणि मग श्रीखंडात मिक्स करा अधिक चांगली चव येते आणि रंगही व्यवस्थित मिक्स होतो. 

उपवासाला खा पौष्टिक मखाणा खीर, ५ मिनिटांत होणारी मखाणा खीर खा - मिळेल इन्स्टंट ताकद...

६. श्रीखंड बनवताना दही पुरणयंत्रातून किंवा मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घ्या. फेटल्यानंतर दही अगदी मऊ असायला हवं त्यात खडे राहायला नको.

७. दह्यात साखर, वेलची पूड घालताना ती व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून बारीक करुन घ्यावी. नाहीतर दह्यात साखरेचे खडे तसेच राहून ते दाताखाली येतात. साखरे ऐवजी आपण पिठीसाखरेचा देखील वापर करु शकतो.  

८. जर श्रीखंड कमी गोड लागत असल्यास, थोडेसे पाणी घेऊन त्या पाण्यात पिठीसाखर विरघळवून घाला आणि मिश्रण एकजीव करा.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्रीअन्नपाककृती