Which fruit not kept in fridge: उन्हाळा म्हटलं की, जास्तीत जास्त लोक वेगवेगळी फळं खाण्यावर भर देतात. खासकरून अशी फळं ज्यांमध्ये भरपूर पाणी असतं. यात कलिंगड आणि खरबूज यांचा अधिक समावेश असतो. लालेलाल आणि रसदार कलिंगडामध्ये 90 टक्के पाण्यासोबतच अनेक पोषक तत्व असतात. यानं शरीर आतून थंड तर राहतंच, सोबतच डिहायड्रेशनपासूनही बचाव होतो. पण जास्तीत जास्त कलिंगड स्टोर करताना एक मोठी चूक करतात. ज्यामुळे कलिंगड तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. बरेच कलिंगड फ्रिजमध्ये स्टोर करतात. जे की फार चुकीचं आहे.
बऱ्याच लोकांचा असा विचार असतो की, उन्हाळ्यात फळं फ्रिजमध्ये स्टोर केली तर ते जास्त काळ ताजी राहतील. पण हा मोठा गैरसमज आहे. वेगवेगळ्या फळांपैकी एक म्हणजे कलिंगड आहे. बरेच लोक एक कलिंगड कापून फ्रिजमध्ये ठेवतात आणि नंतर खातात. पण यामुळे तुम्हाला फूड पॉयजनिंगची समस्या होऊ शकते. असा दावा आमचा नाही तर हे अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे.
कलिंगड फ्रिजमध्ये ठेवण्याचे नुकसान
कलिंगडामध्ये पाणी भरपूर असतं. ज्यामुळे या बॅक्टेरिया जमा होण्याचा धोका अधिक असतो. खासकरून जेव्हा तुम्ही फ्रिजमध्ये कलिंगडाच्या कापलेल्या फोडी ठेवता. अमेरिकेच्याUSDA च्या एका रिपोर्टनुसार, 10°C पेक्षा तापमानात कलिंगडातील लायकोपीन आणि बीटा कॅरोटीनसारखे पोषक तत्व तुटतात. तर कापलेलं कलिंगड जराही खराब असेल तर त्यात बॅक्टेरिया खूप जास्त वाढतात.
काय कराल?
जर कलिंगड पूर्णपणे कापलं नसेल, तर रूमच्या तापमानातच ठेवा. शक्यतो प्रयत्न करा की, कलिंगड कापल्यावर घरातील सगळ्यांनी मिळून पूर्णच खा. जर फ्रिजमध्ये ठेवायचंच असेल तर एक दिवसापेक्षा जास्त ठेवू नका आणि ते झाकून ठेवा.
कलिंगड खाण्याचे फायदे
कलिंगडामध्ये कॅलरी खूप कमी असतात, त्यामुळे या दिवसांमधये तुम्ही कलिंगड नियमितपणे खाल्ल्यास तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.
कलिंगडात फायबरचं प्रमाण भरपूर असतं. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि पोटही व्यवस्थित साफ होतं. इतकंच नाही तर पोट जास्त वेळ भरलेलं राहतं.
कलिंगडामध्ये असलेल्या पोटॅशिअमनं तुम्हाला वाढलेल्या तापमान ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासही मदत मिळेल.
कलिंगडात पाणी भरपूर असल्यानं शरीर हायड्रेटेड राहतं आणि आतून थंडही राहतं.