केर सांगरीची भाजी (Ker - Sangri). पदार्थाचं नाव ऐकूनच आश्चर्य वाटलं ना? खरंतर ही भाजी राजस्थानमध्ये (Rajasthani Special Dish) जास्त प्रचलित आहे. केर म्हणजे फळं आणि सांगरी म्हणजे शेंगा (Healthy Super Food). ही फळं आणि शेंगा मिठाच्या पाण्यात रात्रभर भिजवली जाते, आणि दुसऱ्या दिवशी कडक उन्हात वाळवण्यासाठी ठेवण्यात येते. या वाळलेल्या शेंगा वर्षभर टिकतात. यातच मसाले आणि इतर साहित्य मिक्स करून चमचमीत भाजी तयार केली जाते. या भाजीला मूळ विशेष चव नाही. पण यातील गुणधर्म आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
सांगरीचा वापर दोन प्रकारे केला जातो..
आकाराने लांब आणि पातळ, अशा या सांगरीचा वापर आपण दोन प्रकारे करू शकता. सांगरी आपण उन्हात वाळवून स्टोर करू शकता. किंवा त्याचा थेट वापर भाजी करण्यासाठी करू शकता. सांगरीचा वापर डाळ किंवा भाजीमध्ये देखील करण्यात येतो. यामुळे पदार्थाची चव आणखीन वाढू शकते.
रोजरोज चपात्या लाटण्याची गरजच नाही, ‘या’ पद्धतीनं चपात्या केल्या तर ३ महिने टिकतात
केर - सांगरीची भाजी कशी करायची? पाहा रेसिपी..
सांगरी खाण्याचे फायदे
सांगरी ही भाजी त्याच्या पौष्टीक गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. त्यात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स, खनिजे आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. मुख्य म्हणजे सांगरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वेट लॉससाठी मदत होते. पोटाचे विकार ज्यांना छळत असतात, त्यांच्यासाठी ही भाजी उत्तम मानली जाते.
साखरेची पातळी नियंत्रणात राहते
मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी सांगरीची भाजी फायदेशीर ठरते. त्यातील पौष्टीक गुणधर्म साखरेची पातळी कण्ट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते.
केर - सांगरीचं लोणचं कसं करायचं? पाहा चटकदार कृती
खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते
बॅड कोलेस्टेरॉल आणि हृदयाचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी सांगरी मदत करते. सांगरीमध्ये व्हिटॅमिन सी देखील असते. जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते.
५ वर्षांपर्यंतची मुलं खूप हट्टीपणा करतात? रडून धिंगाणा करतात? पालकांनी करायला हव्या ५ गोष्टी
सांगरी कुठे मिळू शकते?
सांगरी राजस्थानच्या अनेक गावांमध्ये आपल्याला मिळू शकते. चुरू, बिकानेर, जैसलमेर आणि बारमेर जिल्ह्यांमध्ये ही भाजी आढळते. या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये या भाजीचे उत्पादन होते. सांगरी ऑनलाइन देखील उपलब्ध आहे.