साउथ इंडियन पदार्थ जसे की, इडली, डोसा, अप्पे, किंवा अप्पम, हे पदार्थ नाश्त्याला आवडीने खाल्ले जातात. या पदार्थांसोबत खाण्यासाठी चटणी आणि सांबार दिले जाते. खोबऱ्याच्या चटणीमुळे या पदार्थांची चव आणखी वाढते. व आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. नारळाची चटणी अनेक प्रकारची केली जाते.
पण आपण कधी केरळमधील पारंपारिक पद्धतीची खोबऱ्याची चटणी खाल्ली आहे का? प्रत्येक घरात मिक्सर आल्यामुळे पाटा वरवंट्याला लोकं जणू विसरलेत. जर आपल्याला केरळ पद्धतीची खोबऱ्याची चटणी खायची असेल तर, पाटा वरवंट्यावर चटणी तयार करा. यामुळे चटणीची चव द्विगुणित होते(Kerala Coconut Chutney | for Dosa, Idli, Chapati, and Rice).
केरळ पद्धतीची खोबऱ्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य
किसलेलं खोबरं
लाल सुक्या मिरच्या
मीठ
कडीपत्ता
चपातीचा चिवडा; शिळ्या चपात्यांचा कुस्करा करण्याची कुरकुरीत रेसिपी, चविष्ट आणि झटपट
कांदा
आलं
कृती
सर्वप्रथम, पाटा चांगला धुवून घ्या, त्यावर किसलेलं खोबरं ठेवा, पाट्यावर ३ लाल सुक्या मिरच्या घेऊन वरवंट्याने चेचून घ्या. त्याचप्रमाणे कडीपत्ता, कांदा आणि आलं देखील वरवंट्याने चेचून घ्या. किसलेल्या खोबऱ्यावर चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. व सर्वसाहित्य वरवंट्याने एकसारखे वाटून घ्या.
सुईने लसूण सोलण्याची ट्रिक, झटपट सोला लसूण- वेळखाऊ काम आता होईल फटक्यात
वाटून घेत असताना चटणीला नैसर्गिक तेल सुटेल. त्यामुळे फोडणी न देता ही चटणी चवीला भन्नाट लागेल. चटणी तयार झाल्यानंतर त्याचा गोळा तयार करा. अशा प्रकारे केरळमधील खास पारंपारिक पद्धतीची खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी रेडी. आपण ही चटणी, भात, इडली, डोसा किंवा इतर साऊथ इंडियन डिशसोबत खाऊ शकता.