Join us  

केरळास्टाईल कांद्याची चमचमीत चटणी घरीच करा; सोपी रेसिपी, तोंडाला येईल चव-पोटभर जेवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 10:08 AM

Kerala Style Onion Chutney at Home (Kandyachi Chutney) : जेवणाना तोंडी लावणीसाठी कांद्याची चटणी कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूया.

वरण, भात, भाजी, चपाती असं पूर्ण जेवण असेल तरी नेहमी काहीतरी चटपटीत, चवदार खाण्याची इच्छा होत असते.(Kandyachi chutney) वरण भाताबरोबर किंवा चपातीबरोबर तोंडी लावणीसाठी चटणी, लोणचं असे पदार्थ असतील तर जेवणाची चव दुप्पटीने वाढते. कारण सतत भाज्या खाऊनही कंटाळा आलेला असतो. (Kerala Style Onion Chutney Recipe) चटणी करायला (Cooking Tips) फार वेळ लागेल म्हणून लोक असे पदार्थ करणं टाळतात. (Kandyachi Chuteny Recipe in Marathi) जेवणाना तोंडी लावणीसाठी कांद्याची चटणी कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूया. (Cooking Hacks)

कांद्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य (South Indian Style Onion Chutney Recipe)

१) लहान आकाराचे कांदे-  ८ ते १०

२) कढीपत्त्याची पानं- १० ते १५

३) लाल मिरच्या- ४ ते ५

४) चिंच- अर्धी वाटी

५) कोथिबीर- अर्धी वाटी

६) मीठ- चवीनुसार

७)  तेल - गरजेनुसार

साऊथ इंडियन स्टाईल कांद्याची चटणी कशी करायची? (South Indian Style Tomato Onion Chutney)

१) कांद्याची चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी मध्यम आकाराचे किंवा लहान लहान कांद्यांची सांल काढून ते स्वच्छ धुवून घ्या.

२) कढईत तेल घालून तेल गरम झाल्यानंतर त्यात कांदे घाला. १ मिनिटं कांदे परतवून घेतल्यानंतर त्यात लाल मिरच्या घाला. मग बिया काढून घेतलेली चिंच, कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून परतवून घ्या.  

कुरकुरीत भेंडी फ्रायची सोपी रेसिपी-एकदा ट्राय करा, भेंडीला नाक मुरडणारेही आवडीने खातील

3) पाट्यावर वरवंट्याच्या साहाय्याने आधी लाल मिरच्या आणि मीठ बारीक करून घ्या. तुम्ही खलबत्ताही वापरू शकता. पण हे कांदे, मिरच्या बारीक करण्यासाठी मिक्सरचा वापर करणं टाळा कारण मिक्सरमध्ये दळल्यानंतर चटणीला परफेक्ट चव येणार नाही. मिरच्या वाटल्यानंतर तळून घेतलेले कांदे आणि इतर साहित्यही बारीक वाटून घ्या. तयार मिश्रण एका  वाडग्यात काढून घ्या. 

डाळ न भिजवता-न दळता; १ वाटी रव्याचे करा खमंग मेदू वडे-१० मिनिटांत होतील कुरकुरीत वडे

4) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी आणि कढीपत्ते घाला. तुम्ही यात आवडनुसार हिंग सुद्धा घालू शकता. नंतर ही फोडणी  वाटलेल्या मिश्रणात घाला. नंतर चमच्याच्या साहाय्याने कालवून घ्या. तयार आहे कांद्याची चमचमीत चटणी. ही चटणी तुम्ही भाकरी किंवा चपातीबरोबर, भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. यामुळे दोन घास जास्त जेवण जाईल. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न