Lokmat Sakhi >Food > Kesar Pista Kulfi Recipe : खूप उकडतंय, थंड खावंस वाटतंय? घरीच करा स्वादिष्ट केसर पिस्ता कुल्फी; ही घ्या रेसेपी 

Kesar Pista Kulfi Recipe : खूप उकडतंय, थंड खावंस वाटतंय? घरीच करा स्वादिष्ट केसर पिस्ता कुल्फी; ही घ्या रेसेपी 

Kesar Pista Kulfi Recipe : अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत तुम्ही स्वादिष्ट आईस्क्रीमचा आनंद घेऊ शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 05:28 PM2022-03-21T17:28:29+5:302022-03-21T17:36:46+5:30

Kesar Pista Kulfi Recipe : अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत तुम्ही स्वादिष्ट आईस्क्रीमचा आनंद घेऊ शकता.

Kesar Pista Kulfi Recipe : Summer special Easy homemade Kesar Pista Kulfi Recipe | Kesar Pista Kulfi Recipe : खूप उकडतंय, थंड खावंस वाटतंय? घरीच करा स्वादिष्ट केसर पिस्ता कुल्फी; ही घ्या रेसेपी 

Kesar Pista Kulfi Recipe : खूप उकडतंय, थंड खावंस वाटतंय? घरीच करा स्वादिष्ट केसर पिस्ता कुल्फी; ही घ्या रेसेपी 

उन्हाळा म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतं ते म्हणजे थंडगार ज्यूस आणि आईस्क्रीम. आईस्क्रिम खायला अनेकांना आवडतं.  आईस्क्रीमसाठी नेहमीच पैसे खर्च करायला हवेत असं काही नाही. तुम्ही घरच्याघरी सुंदर चवीचं आईस्क्रिम तयार करू शकता. (How to make ice cream at home) अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत तुम्ही स्वादिष्ट आईस्क्रीमचा आनंद घेऊ शकता. या लेखात तुम्हाला केसर पिस्ता कुल्फी कशी बनवायची हे सांगणार आहोत. मटका कुल्फी ही सगळ्यांना आवडते ती घरात अगदी सहज बनवता येते. (Summer Special Ice cream recipe)

साहित्य

दूध = 2 लिटर

साखर = 4-5 चमचे

छोटी वेलची = 8 तुकडे ठेचून

पिस्ता = चिरलेली छोटी अर्धी वाटी

केसर = १/२ टीस्पून

कृती

एका कढईत दूध ठेवा आणि मध्यम आचेवर गरम करा, दुधाला उकळी आली की गॅस पूर्णपणे कमी करा, दूध एक तृतीयांश होईपर्यंत शिजू द्या, मध्ये मध्ये चमचाने ढवळत राहा. दूध एक तृतीयांश झाले की दुधात साखर आणि पिस्ते घालून चांगले ढवळून घ्या. आचेवरून उतरवल्यानंतर थोडा वेळ असेच थंड होण्यासाठी ठेवावे.

आता त्यात केशर आणि वेलची टाका, हे तयार दुधाचे मिश्रण कोणत्याही भांड्यात ठेवा आणि फ्रीजरमध्ये 5 तास फ्रीज करण्यासाठी ठेवा. फ्रीझर पुन्हा पुन्हा उघडू नका, कुल्फी चांगली तयार झाली की फ्रीजमधून बाहेर काढा आणि वर पिस्ते आणि केशरने सजवून सर्व्ह करा.

1)

2) 

Web Title: Kesar Pista Kulfi Recipe : Summer special Easy homemade Kesar Pista Kulfi Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.