Lokmat Sakhi >Food > महाशिवरात्री स्पेशल: विकतची कशाला? घरीच तयार करा केसरीया थंडाई; बमबम भोले म्हणत घ्या थंडाईचा आस्वाद

महाशिवरात्री स्पेशल: विकतची कशाला? घरीच तयार करा केसरीया थंडाई; बमबम भोले म्हणत घ्या थंडाईचा आस्वाद

Kesariya Thandai Recipe | Maha Shivratri Special : देशी स्टाईलने तयार करा स्पेशल थंडाई, जबरदस्त टेस्ट-हेल्थसाठीही उत्तम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2024 12:32 PM2024-03-06T12:32:45+5:302024-03-06T12:33:46+5:30

Kesariya Thandai Recipe | Maha Shivratri Special : देशी स्टाईलने तयार करा स्पेशल थंडाई, जबरदस्त टेस्ट-हेल्थसाठीही उत्तम..

Kesariya Thandai Recipe | Maha Shivratri Special | महाशिवरात्री स्पेशल: विकतची कशाला? घरीच तयार करा केसरीया थंडाई; बमबम भोले म्हणत घ्या थंडाईचा आस्वाद

महाशिवरात्री स्पेशल: विकतची कशाला? घरीच तयार करा केसरीया थंडाई; बमबम भोले म्हणत घ्या थंडाईचा आस्वाद

यंदा ८ मार्च रोजी सर्वत्र महाशिवरात्री (Mahashivratri Special) साजरी होत आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. काही लोकं या दिवशी उपवासही ठेवतात. या दिवशी साबुदाणा खिचडी, साबुदाणे वडे, भगर यासह विविध उपवासाचे पदार्थ केले जातात. विशेष म्हणजे या पदार्थांसह घराघरात थंडाई देखील केली जाते. बाजारात फ्लेवर्ड थंडाई सहज उपलब्ध आहे. पण घरात तयार केलेल्या थंडाईची बातच न्यारी आहे. पारंपरिक थंडाई पिण्याचा आनंद फ्लेवर्ड थंडाईत मिळणे कठीण आहे (Thandai Recipe).

जर आपल्याला घरी देशी पद्धतीची थंडाई तयार करायची असेल तर, ही रेसिपी फॉलो करा (Cooking Tips). घरगुती थंडाई आरोग्यासाठी तर उत्तम ठरतेच, शिवाय बनवायलाही सोपी आहे. पण घरगुती केसरीया थंडाई कशी तयार करायची? पाहूयात(Kesariya Thandai Recipe | Maha Shivratri Special).

केसरीया थंडाई करण्यासाठी लागणारं साहित्य

बदाम

काजू

पिस्ता

टरबूजाच्या बिया

कणिक मळून ठेवली की काळी पडते? कडकही होते? ५ टिप्स; कणिक राहील मऊ - पोळ्या होतील सॉफ्ट

खसखस

वेलची

काळी मिरी

बडीशेप

खडीसाखर

जायफळ पावडर

केसर

गुलाबाच्या पाकळ्या

कृती

सर्वप्रथम, एका प्लेटमध्ये एक कप बदाम, काजू, अर्धा कप पिस्ता, अर्धा कप टरबूजाच्या बिया, ४ चमचे खसखस, वेलची, एक चमचा काळी मिरी, ४ चमचे बडीशेप, एक कप खडीसाखर, जायफळ पावडर, अर्धा चमचा केसर, ड्राय गुलाबाच्या पाकळ्या घेऊन साहित्य मिक्स करा.

साहित्य मिक्स केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून पावडर तयार करा. तयार पावडर एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. तयार थंडाई पावडर स्टोर करून ठेवल्यास महिनाभर आरामात टिकेल.

तोंडी लावण्यासाठी करा हिरव्या टोमॅटोची चटणी; आंबट-गोड चवीची चटणी एकदा खाल तर भूक खवळेल

केसरीया थंडाई तयार करण्यासाठी मोठ्या ग्लासमध्ये सुती कापड ठेवा. सुती कापडावर थंडाई पावडर आणि दूध घालून पिळून घ्या. अशा प्रकारे देशी प्रकारची केसरीया थंडाई पिण्यासाठी रेडी. हरहर महादेव म्हणत या थंडाईचा आस्वाद लुटा. 

Web Title: Kesariya Thandai Recipe | Maha Shivratri Special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.