नाश्त्याला रोज रोज चहा चपाती, पोहे, इडली खाऊन कंटाळा येतो. काहीतरी नवीन हटके खावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण नेहमी बाहेरचं खाल्लं तर पैसे जातात याशिवाय तब्येतीसाठीही ते चांगलं नसतं. तब्येत चांगली ठेवण्यासाठी घरगुती पदार्थ उत्तम ठरतात घरच्याघरी खमण ढोकळा बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. (Cooking Tips)
खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe) हा गुजरातमधील प्रसिद्ध नाश्ता मुंबई उपगरात मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो काहीजणांना हिरव्या तिखट चटणीबरोबर तर काहींना गुळाच्या लाल चटणीबरोबर खमण ढोकळा खायला आवडतो. ( How to make instant khaman dhokla)
खमण ढोकळा बनवण्याची सोपी पद्धत
1) खमण ढोकळा तयार करण्यासाठी प्रथम सर्व बेसन, रवा, मीठ हे सर्व साहित्य तयार करा. ढोकळा बनवण्यासाठी भांड्यात २ ते ३ कप पाणी घाला. मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा.
2) प्लेट ठेवण्यापूर्वी ढोकळा बनवण्याचे भांडे किमान ५ मिनिटे गरम करावे. आता 2 लहान प्लेट्स घ्या (प्लेट्स अशा असाव्यात की त्या भांड्यात सहज ठेवता येतील). 1 टीस्पून तेलाने ग्रीस करा.
3) आता एका मोठ्या भांड्यात बेसन, रवा, लिंबाचा रस, हिरवी मिरची-आलं पेस्ट, दही आणि 3/4 पाणी एकत्र करा. त्यात चवीनुसार मीठ घालावे. आता ते चांगले मिसळा. पिठात गुठळ्या राहणार नाहीत अशा प्रकारे मिसळा. आता या द्रावणात एनो पावडर घाला आणि एक मिनिट फेटून घ्या,
4) यामुळे द्रावण जवळजवळ दुप्पट होईल. यानंतर, लगेचच ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये पिठ घाला. पीठ ओतताना लक्षात ठेवा की प्लेटमध्ये फक्त 1/2 इंच उंचीपर्यंत पिठ भरला पाहिजे.
५) आता ढोकळा बनवण्यासाठी भांड्यात एक स्टँड ठेवा, नंतर त्यावर एक प्लेट ठेवा आणि वाफेच्या मदतीने 10 ते 12 मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्या. यानंतर सुरी घालून ढोकळा तपासा.
६) सुरी घातल्यानंतर तो द्रावणाला चिकटला नाही तर ढोकळा शिजला आहे, नाहीतर अजून थोडा वेळ शिजू द्यावा.