Join us  

खमण ढोकळा फुलतच नाही? त्यात घाला चमचाभर 'हा' सिक्रेट पदार्थ; विकतच्या ढोकळापेक्षा बनेल भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2024 5:00 PM

Khaman Dhokla Recipe | Soft & Fluffy : उपमा-पोहे खाऊन कंटाळले असाल तर, एकदा गुजराथी स्पेशल झटपट खमण ढोकळा करून पाहा..

सकाळच्या नाश्त्याला किंवा मधल्या वेळेत आपल्या प्रचंड भूक लागते (Khaman Dhokla). अशावेळी आपण पोहे, उपमा किंवा साऊथ इंडिअन पदार्थ खातो. पण हे पदार्थ खाऊनही कंटाळा येतो (Dhokla Recipe). अशावेळी आपण  गुजराथी स्पेशल ढोकळा तयार करू शकता. पण घरगुती ढोकळ्याला विकतसारखी चव येत नाही (Cooking Tips). कधी ढोकळा फसतो, तर कधी फुगतच नाही.

जर आपल्या डाळीच्या पिठाचा विकतसारखा खमण ढोकळा तयार करायचं असेल तर, या रेसिपीला नक्की फॉलो करा. मऊ, जाळीदार, स्पाँजी ढोकळा तयार होईल १५ मिनिटात. शिवाय चवीलाही भन्नाट लागेल. चला तर मग सोप्या पद्धतीचा खमण ढोकळा तयार कसा करायचा पाहूयात(Khaman Dhokla Recipe | Soft & Fluffy).

खमण ढोकळा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

बेसन

पाणी

मीठ

दही

हळद

बेकिंग सोडा

फक्त १० मिनिटांत करा अळूची क्रिस्पी भजी; रेसिपी सोपी - चव तीच पारंपरिक अळूवडीची

बेकिंग पावडर

तेल

जिरं

मोहरी

कढीपत्ता

हिरवी मिरची

साखर

अशा पद्धतीने करा खमण ढोकळा

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ वाट्या बेसन घ्या. त्यात एक कप पाणी घाला. पाणी घातल्यानंतर व्हिस्करने मिक्स करा. नंतर त्यात एक चमचा साखर, २ मोठे चमचे दही घालून मिक्स करा. आता फरमेण्ट होण्यासाठी त्यावर ७ ते ८ तासांसाठी झाकण लावून ठेवा. जेणेकरून ढोकळा छान फुलेल. ७ तासानंतर झाकण काढा. पीठ छान फुललेलं आपल्याला पाहायला मिळेल. आता त्यात अर्धा कप पाणी घाला.

ना डाळ- तांदूळ, ना इनो अगदी इडली पात्रही नको! करा १० मिनिटात इडली पात्राशिवाय इडली

नंतर त्यात चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, २ चमचे तेल घालून मिक्स करा, आणि शेवटी अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून मिक्स करा. आता कढई गरम करण्यासाठी ठेवा. एक मोठी प्लेट घ्या, त्यावर ब्रशने तेल लावा. त्यात बॅटर ओतून पसरवा. कढईमध्ये स्टॅण्ड ठेवा. त्यावर प्लेट ठेवून झाका. वाफेवर १० मिनिटांसाठी ढोकळा शिजवून घ्या. अशा प्रकारे ढोकळा रेडी.

फोडणीसाठी कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक चमचा तेल घाला. नंतर त्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून मिक्स करा. मग त्यात अर्धा कप पाणी आणि साखर घाला. ५ मिनितानंतर गॅस बंद करा. तयार फोडणी ढोकळ्यावर ओतून डिश सर्व्ह करा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स