Join us  

मिक्सरच्या भांड्यात १० मिनिटात करा जाळीदार स्पॉन्जी ढोकळा; टिफिनसाठी बेस्ट - सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2024 6:22 PM

Khaman Dhokla Recipe - Soft & Spongy Instant Gujarati Recipe : खमण ढोकळा फसतो - फुगतच नाही? तर 'या' पद्धतीने झटपट ढोकळा करून पाहा..

गुजराथचे अनेक पदार्थ संपूर्ण भारतात फेमस आहेत (Khaman Dhokla). जिलेबी, फाफडा यासह खमण ढोकळा आवर्जून खाल्ला जातो. ढोकळा अनेक प्रकारचे केले जातात. त्यात २ प्रकार खूप फेमस आहेत (Cooking Tips). एक रव्याचा तर दुसरा डाळीचा ढोकळा लोक आवर्जुन खातात (Kitchen Tips). रव्याचा पांढरा लवकर झटपट तयार होतो (Dhokla Recipe). तर डाळीचा पिवळा ढोकळा तयार करण्यासाठी बराच वेळ जातो.

पण जर आपल्याला खमण ढोकळा झटपट करायचं असेल तर, बेसनाचा वापर करून मऊ ढोकळा तयार करा. आपण यासाठी मिक्सरची देखील मदत घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्यात झटपट ढोकळा तयार होतो. खमण ढोकळा बनवताना जास्त झंझट देखील होत नाही(Khaman Dhokla Recipe - Soft & Spongy Instant Gujarati Recipe).

इन्स्टंट जाळीदार ढोकळा कसा करायचा?

लागणारं साहित्य 

बेसन

पावसाळ्यात मुरमुऱ्याचा चिवडा सादळतो, मऊ होतो? त्यात ' हा ' मसाला घाला, चिवडा होईल कुरकुरीत

तेल

साखर

हिंग

सायट्रिक अॅसिड

मीठ

बेकिंग सोडा

कृती

सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात दीड कप बेसन घ्या. त्यात ३ मोठे चमचे तेल घाला. नंतर २ चमचे साखर, अर्धा छोटा चमचा हिंग, चिमुटभर हिंग, एक छोटा चमचा सायट्रिक अॅसिड घालून वाटून घ्या. नंतर त्यात चवीनुसार मीठ, एक चमचा बेकिंग सोडा घालून पुन्हा वाटून घ्या.

पालकाची भाजी नेहमीचीच, करा पालकाची चटणी! तोंडी लावण्यासाठी चमचमीत पदार्थ, पालक आवडायला लागेल

स्टीमरमध्ये पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर स्टॅण्ड ठेवा. स्टॅण्डवर प्लेट ठेवा, प्लेटला ब्रशने तेल लावा, आणि त्यात बॅटर ओता. त्यावर झाकण ठेवा. वाफेवर ढोकळा ८ ते १० मिनिटांसाठी शिजवून घ्या. १० मिनिटानंतर वाफेवर ढोकळा शिजला आहे की नाही चेक करा. प्लेट बाहेर काढा. थंड झाल्यानंतर ढोकळा कट करा.

दुसरीकडे फोडणीची पळी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, जिरं, बारीक उभी चिरलेली हिरवी मिरची, कडीपत्ता, साखर, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून मिक्स करा. तयार फोडणी ढोकळ्यावर ओता. अशाप्रकारे इन्स्टंट जाळीदार ढोकळा खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.