Lokmat Sakhi >Food > पावसाळी वातावरणात करा गरमागरम शेव भाजी; ट्राय करायलाच हवी अस्सल खान्देशी रेसिपी

पावसाळी वातावरणात करा गरमागरम शेव भाजी; ट्राय करायलाच हवी अस्सल खान्देशी रेसिपी

Khandesh Style Shev Bhaji Special Recipe : झटपट होणारी आणि अतिशय चविष्ट अशी शेवभाजी हा उत्तम पर्याय ठरतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2023 11:16 AM2023-07-30T11:16:37+5:302023-08-02T09:58:54+5:30

Khandesh Style Shev Bhaji Special Recipe : झटपट होणारी आणि अतिशय चविष्ट अशी शेवभाजी हा उत्तम पर्याय ठरतो.

Khandesh Style Shev Bhaji Special Recipe : Shev hot vegetables in rainy weather; A must try authentic Khandeshi recipe | पावसाळी वातावरणात करा गरमागरम शेव भाजी; ट्राय करायलाच हवी अस्सल खान्देशी रेसिपी

पावसाळी वातावरणात करा गरमागरम शेव भाजी; ट्राय करायलाच हवी अस्सल खान्देशी रेसिपी

पावसाळ्याच्या दिवसांत बाजारात म्हणाव्या तितक्या भाज्या मिळत नाहीत. मिळाल्या तरी एकतर त्या सडलेल्या असतात नाहीतर त्याचे दर खूप जास्त असतात. या वातावरणात पालेभाज्या तर आपण खातच नाही. कडधान्य पचायला जड असल्याने तिही फार खाल्ली जात नाहीत. सतत फळभाज्या खाऊन कंटाळा येतो. अशावेळी रोज वेगळं आणि तरीही चविष्ट काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. विकेंडला तर काहीतरी वेगळं आणि चमचमीत हवं असतं. पावसाच्या काळात आपण बाहेरचं खाणंही टाळतो. अशावेळी झटपट होणारी आणि अतिशय चविष्ट अशी शेवभाजी हा उत्तम पर्याय ठरतो (Khandesh Style Shev Bhaji Special Recipe). 

गरम पोळ्या, फुलके अगदी ब्रेडसोबतही ही शेवभाजी खाता येत असल्याने कोणी पाहुणे येणार असतील तरी आपण झटपट ती करु शकतो. यात वापरली जाणारी जाडसर लाल रंगाच्या भावनगरी शेवेला एक वेगळीच चव असते. महाराष्ट्राच्या विविध भागात ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. पण खान्देशात ही भाजी करण्याची खास पद्धत आहे. अगदी ढाब्यावरही ही भाजी आवर्जून मिळते. पाहूया ही शेवेची भाजी नेमकी कशी करायची. 

(Image : Google)
(Image : Google)

साहित्य -

१. कांदा - २ ते ३

२. टोमॅटो - २ लहान

३. खोबरं - १ वाटी 

४. लसूण - ५ ते ७ पाकळ्या 

५. आलं - १ इंच

६. शेव - अर्धा किलो 

७. तेल - अर्धी वाटी 

८. गोडा मसाला - अर्धा चमचा 

९. कांदा लसूण मसाला - १ चमचा 

१०. धणेजीरे पावडर - अर्धा चमचा 

११. तिखट - अर्धा चमचा 

१२. हळद - अर्धा चमचा 

१३. जीरे - अर्धा चमचा 

१४. हिंग - पाव चमचा 

१५. कोथिंबीर - अर्धी वाटी 

१६. मीठ - चवीनुसार 

कृती -

१. एका पॅनमध्ये थोडेसे तेल घेऊन त्यात कांदा, खोबरं, आलं आणि लसूण चांगले खरपूस परतून घ्यायचे. 

२. हे सगळे थोडे गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवायचे आणि त्याच पॅनमध्ये टोमॅटोचे काप करुन परतायचे. 

३. तेही मिक्सरच्या भांड्यात घालायचे, मूठभर शेवही या मिक्सरच्या भांड्यात घालून सगळे बारीक करुन घ्यायचे.

४. पॅनमध्ये तेल घालून त्यात जीरं आणि हिंग घालून हे मिश्रण त्यात घालून चांगले परतून घ्यायचे. 

५. अंदाजे थोडेसे पाणी घालून यामध्ये गोडा मसाला, तिखट, हळद, कांदा लसूण मसाला, धणेजीरे पावडर, मीठ घालून पुन्हा थोडे पाणी घालून एकसारखे करायचे. 

६. चांगले रटरट शिजले की गॅस बारीक करुन त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि शेव घालून ही भाजी गरम फुलके किंवा पोळीसोबत लगेच खायला घ्यायची. 

७. यावर लिंबाचा रस पिळल्यास त्याची चव आणखी छान लागते. तसेच सोबत कांदा, काकडी असेल तर मजा येते. 
 

Web Title: Khandesh Style Shev Bhaji Special Recipe : Shev hot vegetables in rainy weather; A must try authentic Khandeshi recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.