दुपारी वरण-भात, पोळी-भाजीचं पूर्ण जेवण केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा पूर्ण जेवण बनवायला कंटाळा येतो. रात्रीच्या वेळी बनवायला सोपे आणि पचायला हलके असलेले पदार्थ बरे पडतात. (Cooking Hacks) साधा वरण भात खाऊन अनेकांना जेवल्यासारखं वाटत नाही किंवा नेहमी त्याच त्याच चवीचा वरण भात खाऊन कंटाळा आलेला असतो. (Khandeshi Khichdi Recipe in Marathi)अशावेळी डाळ-तांदळाची पौष्टीक मसालेदार खिचडी रात्रीच्या जेवणाला ट्राय करू शकता. (How to make Khandeshi khichdi)
खान्देशी खिचडी बनवताना तुम्ही यात एकापेक्षा जास्त डाळी, आवडीच्या भाज्या किंवा मसाल्याचे प्रमाण कमी, जास्त करू शकता जेणेकरून खिचडी अधिक पौष्टीक बनेल. खान्देशातील घराघरांत खिचडीचा हा प्रकार केला जातो. घरात कमी साहित्य उपलब्ध असेल तरीही तुम्ही ही रेसिपी करू शकता. (khandeshi Masala khichdi)
खान्देशी खिचडी बनवण्याची योग्य पद्धत (Khandeshi Masala Khichdi Recipe)
१) एक मोठी वाटी तांदूळ घ्या. तुम्ही नेहमी वापरता तो जाड, बारीक, बासमती किंवा सर्व तांदूळ थोडे थोडे एकत्र करूनही घेऊ शकता. त्यात अर्धा ते पाऊण वाटी डाळ घाला. डाळ, तांदूळाचे मिश्रण स्वच्छ धुवून घ्या नंतर १५ मिनिटांसाठी पाण्यात भिजवून ठेवा.
२) तांदूळ भिजेपर्यंत वाटण तयार करून घ्या. एका मिक्सरच्या भांड्यात २ ते ३ मिरच्या, कोथिंबीर, सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालून पाणी न घालता जाडसर वाटण तयार करा.
एकदम सॉफ्ट-स्पाँजी ताकातला ढोकळा घरीच करा; १ सिक्रेट पदार्थ घाला, परफेक्ट पांढरा ढोकळा खा
३) कुकरमध्ये ३ ते ४ पळ्या तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहोरी, जीरं तडतडल्यानंतर कढीपत्ता, कांदे परतून घ्या आणि वाटण घालून तेल सुटेपर्यंत शिजवा.वाटण परतल्यानंतर २ चिमुट हिंग, हळद आणि लाल तिखट, काळा मसाला घाला. (तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही गरम मसाला घालू शकता) नंतर कच्च्या बटाट्याचे काप घाला. तुम्ही आवडीनुससार यात टोमॅटोही घालू शकता.
४) ५ मिनिटांनंतर त्यात भिजवलेले तांदूळ आणि डाळ पाणी काढून कुकरमध्ये घाला. सर्व मसाले डाळ-तांदळाला लागतील या पद्धतीने चमच्याने एकजीव करून घ्या. नंतर यात पाणी घाला. व्यवस्थित तांदूळ-डाळ शिजेल इतकं गरम पाणी घाला.
वाटीभर बेसनाचा ५ मिनिटांत करा 'इडली ढोकळा'; फुललेला ढोकळा इडली पात्रात करण्याची भन्नाट ट्रिक
५) त्यात मीठ घालून चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्या. मग झाकण लावून ३ ते ४ शिट्ट्या होईपर्यंत खिचडी शिजवून घ्या. शिट्या झाल्यानंतर कुकरमधील वाफ काढून खिचडी एका ताटात काढून पापड, लोणचं आणि काद्यांबरोबर सर्व्ह करा.