Join us  

शाळेबाहेर मिळायची तशी चिंच आठवते? मग करा चिंचेची कँडी, चव अशी आठवतील शाळकरी आनंदी दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2023 12:02 PM

Khatti | Methi Imli | Tamarind Twist Candy चिंच म्हटलं की तोंडाला पाणी सुटतेच, लहानग्यांना शुगर कॅण्डी देण्याऐवजी चिंचेची कॅण्डी द्या

दिवस किती पटापट निघून जातात, कळूनही येत नाही. प्रत्येक दिवस सारखाच वाटतो. पण मागे वळून पाहिलं की सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. बालपणीचे दिवस, धम्माल किस्से, व लहानपणी खाल्लेले पदार्थ आठवतात. शाळा सुटली की, शाळेबाहेर एक खाऊचं दुकान असायचं, त्या दुकानात १ - २ रुपयाला चटक-मटक चवीला चटकदार असे पदार्थ मिळायचे. ज्यात चिंचेच्या कॅण्डीचा देखील समावेश असायचा. चिंच म्हटलं की हमखास तोंडाला पाणी सुटते.

आंबट - गोड चवीची चिंचेची कॅण्डी चोखत आपण घर गाठायचो. चिंच खाण्याचे अनेक फायदे आहेत. चिंचेमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे मुलांना शुगर कॅण्डी देण्यापेक्षा, घरच्या घरी तयार चिंचेची कॅण्डी खायला देऊ शकता(Khatti | Methi Imli | Tamarind Twist Candy).

चिंचेची कॅण्डी करण्यासाठी लागणारं साहित्य

चिंच

खजूर

लाल तिखट

साबुदाणा न भिजवताही करा उत्तम साबुदाणा खिचडी, १ ट्रिक - करा झटपट खिचडी

जिरे पूड

मीठ

तूप

गुळ

कृती

सर्वप्रथम, एका मोठया बाऊलमध्ये एक कप चिंच घ्या, त्यात अर्धा कप बिया काढलेले खजूर, व गरम पाणी घालून १५ मिनिटांसाठी भिजत ठेवा. १५ मिनिटानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजलेली चिंच आणि खजूर घालून पेस्ट तयार करा. मोठ्या बाऊलवर मोठी गाळणी ठेवा, व त्यावर तयार चिंचेची पेस्ट घालून गाळून घ्या. दुसरीकडे पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात चिंचेची पेस्ट घालून चमच्याने ढवळत राहा. नंतर त्यात एक चमचा लाल तिखट, एक चमचा जिरे पूड, अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तूप घालून मिक्स करा.

१ वाटी चणाडाळीची करा कुरकुरीत खमंग ‘खारीडाळ’! चटकमटक खायचं असेल तर पाहा खारीडाळ कशी करतात?

मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यात एक कप किसलेला गुळ घाला. व चमच्याने सतत ढवळत राहा. मिश्रणाला घट्टपणा आल्यानंतर गॅस बंद करा. एक आईसस्क्रीम स्टिक घ्या. स्टिक चिंचेच्या मिश्रणात बुडवून त्यावर प्लास्टिक कव्हर लावून गुंडाळून घ्या. फ्रिजमध्ये आपण कॅण्डी सेट करण्यासाठी ठेऊ शकता. अशा प्रकारे आंबट - गोड चवीची चिंचेची कॅण्डी खाण्यासाठी रेडी. साठवून ठेवल्यास चिंचेची कॅण्डी महिनाभर आरामात टिकेल. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स